पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पीसीइटीच्या पीसीसीओईआर मध्ये सकाळी १०:०० वाजता आंतरराष्ट्रीय शिक्षण मेळा अलिफ ओव्हरसीज, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन पीसीओइआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, डॉ. रमेश राठोड, डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. ऐश्वर्या गोपाल कृष्णन यांच्या हस्ते झाले. (PCMC)
या मेळ्यात ३० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. या मेळाव्यात बीएसबीआय (जर्मनी), रॉयल हॉलवे (युके), युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स ट्रिनिटी सेंट डेविड (युके), वेबस्टर युनिव्हर्सिटी (स्विझर्लंड), नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड (आयर्लंड), लीड्स ट्रिनिटी (युके), हेरियट व्हॉट (युके), यूमास बोस्टन (युएसए), युनिव्हर्सिटी कॅनडा वेस्ट (कॅनडा) यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांना ईयू बिजनेस स्कूल (जर्मनी), जीआयसी (जर्मनी) आणि हुल्ट बिझनेस स्कूल (युएई) या संस्थांकडून मार्गदर्शन मिळाले. तसेच एचडीएफसी क्रेडीला, क्लब सेवेन फॉरेक्स आणि युनिव्हर्सिटी लिव्हिंग (अकॉमोडेशन वेंडर) या व्यवसायिकांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. न्युझीलँड, आयर्लंड या ठिकाणांचे शिक्षणाचे फायदे प्रवेश प्रक्रियेतील बारकावे समजावून सांगितले. (PCMC)
या मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना विविध देशांतील शिक्षण संधी व शिष्यवृत्ती बाबत माहिती देण्यात आली.
पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थी आणि इतर सहभागींचे या मेळाव्यात स्वागत केले.
हे ही वाचा :
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती
जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी