पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जे. एस. पी. एम. राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व आईटी विभागाच्या वतीने यंग इंडिया च्या सहकार्याने व्यसनमुक्ती या विषयावर युवकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (PCMC)
सहाय्यक पो निरीक्षक तानाजी कदम, उच्च न्यायालयाचे वकील ऍड अक्षय देशमुख, मानसशास्त्रज्ञ डॉ. अनुराधा करकरे, समाजसेवक डॉ. अजय दुधाने आदी मान्यवरांची प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते . तसेच हे सर्व मान्यवर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ. संतोष भोसले, उपसंचालक डॉ. अविनाश देवस्थळी, संकुल संचालक रवि सावंत, संचालक प्रा.सुधीर भिलारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.बी. गाडेकर, शिक्षक प्रतिनिधी डॉ. जी.एस.माटे, डॉ. ए.जे. जाधव आदी उपस्थित होते. (PCMC)
मित्रांच्या संगतीने एकदा व्यसन केले म्हणून व्यसनी बनत नाही. परिस्थितीने तरुणाई व्यसनी बनते. व्यसनधिता हा आजार असतो. कायदेशीर शिक्षा करणे हा यावर पर्याय नसून त्याला समुपदेशनाने व्यसनापासून दूर ठेवणे शक्य आहे.यासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वयक असावा. असे मत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.
तरुणाई मध्ये वाढत्या व्यसनाचे प्रमाण अधिक आढळत आहे. तसेच आजची तरुणाई गुटखा, तंबाकू, मद्य सेवन तसेच विविध अमली पदार्थाच्या आहारी जाऊन स्वतःचा आणि पर्यायाने समाजाचा जीव धोक्यात घालत आहे, ह्या वाढत्या सेवनामुळे कर्करोग आणि तत्सम कित्येक आजारांना सामोर जावं लागते.
सामाजिक दृष्ट्या तसेच आरोग्यावर होणारे वाईट प्रभाव हा देशाच्या जडणघडणीला कुठेतरी इजा करू शकतो हे लक्षात घेऊन ह्या शिबिराचे आयोजन केले होते.
हा मार्गदर्शन शिबिर यशस्वीतेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक हर्षवर्धन गायकवाड, निर्मिती चौधरी आणि अभिषेक मसने यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजाला सशक्त , सद्रुढ व सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागांनी यंग इंडिया च्या सहकार्याने राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होणारा व्यसन मुक्ती तसेच त्यावरील उपाय योजना हा कार्यक्रम या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता.