Thursday, October 10, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आदर्श तरुण मंडळ लोंढे नगर, चिंचवडचा उत्कृष्ठ देखावा

PCMC : आदर्श तरुण मंडळ लोंढे नगर, चिंचवडचा उत्कृष्ठ देखावा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : आदर्श तरुण मंडळ लोंढे नगर, चिंचवड या मंडळाचे 53 वे वर्ष आहे. या वर्षी मंडळाने भगवान शिव शंकराचे तांडव नृत्य हा अत्यंत मनमोहक देखावा सादर केला आहे. (PCMC)

हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक तर येतातच, पण बाहेरील परिसरातून सुद्धा नागरिक येतात.

मंडळाच्या वतीने संपूर्ण दहा दिवस फक्त याचं काळात उपक्रम राबवून न थांबता बाराही महिने सामाजिक उपक्रम व आवश्यक ठिकाणी आत्यावश्यक मदत व विविध उपक्रम राबविले जातात. पारंपारीक पद्धतीने मोठी मिरणूक काढली जाते. (PCMC)

मंडळाचे अधारस्थंभ बाळासाहेब लोंढे, अध्यक्ष कविश्वर चांदने, उपाध्यक्ष हेमंत लोंढे, खजिनदार पवन चांदने, उपखजिनदार अजय लोंढे, विवेक परंगडोले आदी पदाधिकारी पूर्णवेळ यात सहभाग घेतात. तर परिसरातील व्यवसायिक, विविध मान्यवर व नागरिक यात स्वतःहून सहभाग घेतात.

संबंधित लेख

लोकप्रिय