Wednesday, December 18, 2024
HomeNewsPCMC:केशवनगर चिंचवड मध्ये भाजपचे घर चलो अभियानास मोठा प्रतिसाद

PCMC:केशवनगर चिंचवड मध्ये भाजपचे घर चलो अभियानास मोठा प्रतिसाद

३५० पेक्षा जास्त घरांमध्ये जनसंपर्क

पिंपरी-चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.११-शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी ४ फेब्रुवारीपासून शहरात “घर चलो अभियान” राबविण्यात येत असून,या अभियानाला पिंपरी चिंचवड शहरवासियांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात हे यशस्वी आभियान सुरु आहे.

या अभियानांतर्गत भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव व महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे त्यांच्याकडील वारियर्स म्हणून सोपविलेले चिंचवड मधील काकडेपार्क,केशवनगर, राज पार्क,काकडे टाऊन शिप,पोदार शाळा आदी भागातील बूथ क्रमांक १३९,१४०,१४१ बूथ वरील नागरिकांशी संवाद साधला.दोन दिवसात केशवनगर,विवेक वसाहत,राजपार्क,काकडे टाऊन शिप,केशवनगर या भागातील ३५० पेक्षा जास्त घरांमध्ये तसेच महत्वाच्या मान्यवरांच्या घरी कार्यकर्त्यासह जावून मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती दिली.

सकाळी ९ वाजता वारियर्स मधुकर बच्चे यांच्या निवासस्थानी चहा – नाष्टा करून अभियानाला सूरूवात झाली. दोन दिवसात या भागातील ३५० पेक्षा जास्त घरांमध्ये जावून नागरिकांसोबत संवाद साधून मोदी सरकारचा दहा वर्षातील विकास, विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देवून २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारत आणि महासत्ता करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान बनविण्याच्या दृष्टीने आवाहन करण्यात आले.

या अभियानात प्रवासी कार्यकर्ता म्हणून भाजपा जेष्ठ पदाधिकारी रविकुमार चौधरी यांनी जबाबदारी पार पाडली.भाजपा माजी महिला शहराध्यक्षा व बुथ प्रमुख उज्वला गावडे,पल्लवी पाठक,भावना पवार,रविकुमार चौधरी,आदी बुथ तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते

संबंधित लेख

लोकप्रिय