Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट...

PCMC : पिंपरी चिंचवडमध्ये भंगार गोदामाला भीषण आग, रहिवासी भागात धुराचे लोट (Video)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिखलीतील कुदळवाडी भागात भंगार मालाच्या गोदामाना आगी लागल्या आहेत. आज सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारास चिखली एसटीपी प्लांट जवळ अंदाजे 12 भंगार दुकानांना भीषण आगी लागल्या. (PCMC)

यात काही गोदामे आगीत जळून खाक झाली आहे. ही आग इतकी भीषण होती की, हवेत खूप उंचापर्यंत सर्वत्र आगीच्या धुराचे काळेकुट्ट लोट पसरले.

या आगीच्या घटनेनंतर चिखली, मोशी, तळवडे येथून पिंपरी चिंचवड मनपाची या भागातून दहा ते बारा अग्निशमन पथके दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागली तो संपूर्ण परिसरात अग्निशमन दलाच्या गाड्या जाण्यासाठी अडचणी व अडथळ्यांचा आहेत. गोदामामध्ये ऑक्सिजनचे एलपीजीचे सिलेंडर असून या आगीमध्ये त्याचेही स्फोट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (PCMC)

या आगीच्या घटनेनंतर चिखली मोशी तळवडे या भागातून दहा ते बारा अग्निशमन बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जिथे आग लागली तिथे भंगार दुकाने व गोदामांची अतिशय गर्दी असून रस्ते देखील अरुंद आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाला गाड्या पोहोचण्यास अडचणीचे ठरले. तसेच गोदामामध्ये ऑक्सिजनचे एलपीजीचे सिलेंडर असून या आगीमध्ये त्याचेही स्फोट होत आहेत. या आगी मुळे रहिवासी भागात धुराचे लोट आणि प्रदूषण पसरले आहे.

सतत आगी लागतात, प्रदूषण वाढते – सामाजिक कार्यकर्ते – राहुल सोनवणे

चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनावणे यांनी सांगितले की, या परिसरात भंगार गोदामाना वारंवार आगी लागतात. त्यामुळे रहिवासी परिसरात प्रदूषण वाढते. येथे रासायनिक, जळाऊ भंगार गोळा करतात. सरकारच्या सुरक्षा नियमावलीचे पालन आणि दुकानाचे सेफ्टी ऑडिट करून सुरक्षा नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करावी, असे राहुल सोनवणे म्हणाले.

PCMC

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती

पुणे येथे विविध पदांसाठी भरती; विनापरीक्षा होणार भरती

पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत भरती सुरू; आजच अर्ज करा !

संबंधित लेख

लोकप्रिय