पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाराष्ट्रभर पसरलेला कंजार भाट समाज हा भटके विमुक्त समाज म्हणून ओळखला जातो. या समाजाला शासकीय योजना व शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी १९६१ साल पूर्वीचा महाराष्ट्र राज्यातील रहिवास पुरावा सादर करावा लागतो. मुळातच या समाजातील नागरिकांचे शिक्षण अत्यल्प असल्यामुळे असे महसुली पुरावे जमा करणे शक्य होत नाही. pcmc
त्यामुळे या समाजातील विद्यार्थी व नागरिकांना शिक्षण व शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. याबाबत शासन स्तरावर कंजार भाट समाज विकास कृती समिती, महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून शासन आपल्या दारी हा उपक्रम पिंपरीत बुधवारी घेण्यात आला. याचे उद्घाटन माजी महापौर कवीचंद भाट, समितीचे सल्लागार मुरचंद भाट यांच्या हस्ते करण्यात आले. pcmc
यावेळी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव तसेच भोसरी, पिंपरी, चिंचवड, रहाटणी येथील महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी आणि भाट समाजातील पुणे, पिंपरी चिंचवड व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी समाजातील १६३ विद्यार्थ्यांनी जात दाखला मिळवण्यासाठी अर्ज सादर केले. लवकरच याबाबत पुढील कारवाई करून संबंधितांना जात दाखले देण्यात येतील अशी माहिती समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष मनोज माछरे यांनी प्रसिद्धीस दिली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश नवले, अक्षय माछरे, गणेश माछरे, अभय भाट, बबलू कराळे, सुभाष माचरे, मोहन नवले, दर्शन मलके, प्रकाश रावळकर, निलेश माछरे, जतन बागडे, विशाल भाट, रंजीत मलके, विनीत गुमाने, लखन कराळे, अमोल भाट, राहुल भाट, साहिल गारूंगे, अनिल गारूंगे, धीरज तामचिकर, भूपेंद्र तामचिकर, मेहुल भाट, रोहन भाट, प्रतीक भाट, सौरभ तामचीकर, गणेश कराळे, सुरेंद्र इंद्रेकर, निलेश माछरे, नम्रता भाट, अंजली भाट, अक्षय भाट, बलराम कराळे, मयूर तामचीकर, राज माछरे, अतिश मलके, शैलेंद्र तामजीकर, किरण माछरे, रोहन भाट आदींनी परिश्रम केले. pcmc
स्वागत सुभाष हरिलाल माछरे, सूत्रसंचालन नम्रता भाट व प्रतिमा अक्षय माछरे आणि आभार अक्षय माछरे यांनी मानले.