Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी शैक्षणिक क्रांतीचे रणशिंग फुंकले -...

PCMC : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी शैक्षणिक क्रांतीचे रणशिंग फुंकले – मधुकर बच्चे

वुई टुगेदर फाउंडेशन, पिंपरी चिंचवडच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिना निमित्त वुई टुगेदर फाउंडेशन (We together foundation) च्या वतीने केशवनगर, चिंचवड येथे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळी फाउंडेशनचे सल्लागार मधुकर बच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दि.6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाण्याने जनतेवर झालेला आघात, झालेले दुःख खूप मोठे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीयता, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, समतावादी समाज परिवर्तनासाठी शिक्षण प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. यासाठी विविध शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केल्या. एक भाकरी कमी खा पण लेकरांना शाळेत घाला, असा संदेश त्यांनी देशातील विविध जाती समुदायातील लोकांना दिला.

अस्पृश्यता, अंधश्रद्धा शिक्षणाशिवाय आणि पुस्तके वाचल्याशिवाय दूर होणार नाही, असे बाबासाहेब भाषणातून सांगायचे, त्यांनी लिहिलेल्या संविधानानुसार आपला देश प्रगती करत आहे. आजचा आधुनिक भारत देश आणि सर्वात जास्त शिकलेली पिढी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक क्रांतीचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेसाठी शैक्षणिक क्रांतीचे रणशिंग फुंकले, असे मधुकर बच्चे म्हणाले. (PCMC)

फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद आणि मान्यवरांनी यांनी बाबासाहेब डॉ. आंबेडकर अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. – सलीम सय्यद

बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे विद्वान, समाजसुधारक आणि भारतातील सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे नेते होते. त्यांनी समानतेचा भारत स्थापन केला, एक देश ज्याने ऐतिहासिकदृष्ट्या वंचित असलेल्या लोकांना मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या, असे वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद म्हणाले.
त्यांनी बाबासाहेबांची जगभर असलेली ख्याती, त्यांनी समाजात केलेला बदल, तसेच भारताला दिलेले संविधान याविषयीं सविस्तर माहिती दिली.

या वेळी सलीम सय्यद, मधुकर बच्चे, सचिव जयंत कुलकर्णी खजिनदार दिलीप चक्रे, रवींद्र काळे, गणेश बच्चे, सदाशिव गुरव, श्रीनिवास जोशी अनिल पोरे, शंकरराव कुलकर्णी, मोहम्मद शेख, अर्जुन पाटोळे, पोपट बच्चे, अर्चना बच्चे,
आकाश खिल्लारे, मच्छिन्द्र थोरवे, उत्तम विटुळे, सखाराम देशपांडे,आदी संस्थेचे पदाधिकारी व नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आबेडकर यांना आभिवादन केले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय

95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त

मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत

संबंधित लेख

लोकप्रिय