‘वात्सल्य मतिमंद मुलांची निवासी शाळा, देहूगाव’ येथे ५०० किलो रद्दी दान उपक्रम PCMC
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.२३ – सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे, आधार शैक्षणिक संस्था पुणे, एक्सलेंट इंटरनॅशनल स्कुल जाधववाडी व समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर या सामाजिक संस्थांनी राबविलेल्या ‘पैसे नको,रद्दी द्या’ या अभिनव उपक्रमास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत सुमारे पाचशे किलो रद्दी दान हे ‘वात्सल्य मतिमंद मुलांची निवासी शाळा,देहूगाव’ येथे देण्यात आली. PCMC
या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात व अमित कोकणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके, खेड तालुका अध्यक्ष अमोल नेपते, मुळशी तालुका अध्यक्ष नामदेव चौगले, सदस्य आदिनाथ शिंदे, प्रकाश रसाळ, सलमान शहा, संतोष वाघमारे, श्रीकांत लिमकर, शुभांगी लाड, गौरव मांडे, सक्षम वायकर, तीर्था थोरात आदी या कार्यक्रमास उपस्थित होते. pcmc news
वात्सल्य मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये ५५ अनाथ,निराधार मुले आहेत, त्यांचे संगोपन करण्यासाठी भरपूर खर्च येत असतो.
सामाजिक भावनेतून हा उपक्रम रद्दी दानाच्या माध्यमातून घेऊन ही मतिमंद मुले या रद्दीपासून मशीन मध्ये क्रश करून तिचे काचेच्या वस्तू पॅकिंग करणेसाठी वापर केला जातो व तिला दुप्पट भाव मिळतो, अशा या रद्दीच्या दानाने त्यांना कच्चा माल उपलब्ध होतो. मुलांना काम पण मिळते, त्यातून अर्थार्जन होते. असे वात्सल्य संस्थेचे संस्थापक विलास देवतरसे यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी म्हणून रद्दी फक्त एकदाच न देता विविध प्रकारे मदत करणार आहोत. त्याव्यतिरिक्त दिवाळी साहित्य विक्री, पर्यावरण पूरक गणपती मूर्ती विक्री आणि राखी विक्री अशा या मतिमंद मुलांना आधारभूत ठरणाऱ्या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ चे पुणे जिल्हा अध्यक्ष व आधार शैक्षणिक संस्था पुणेचे सचिव किशोर थोरात यांनी सांगितले.
उपस्थित सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघचे पुणे येथील पदाधिकारी व सदस्य यांनी मागील आठ दिवसात रद्दी गोळा करण्याचा निश्चय करून तो गरजू पर्यंत पोहोचण्यासाठी मेहेनत घेतली. शहरातील विविध केंद्रातून नागरिकांनी रद्दी दान केली.
यावेळी मुलांना खाऊ, केळी चे वाटप करण्यात आले व सर्व रद्दी दात्यांचे व खाऊ दात्यांचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित कोकणे यांनी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले.
तसेच संस्थेच्या वतीने शाळेसाठी काही वृक्षांची रोपे पण दान करण्यात आली. संस्थेचे राष्टीय अध्यक्ष राजेश कुंभारे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या मार्फत विविध उपक्रम राबवले जातात.pcmc
पुणे टीम ने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल संस्थेच्या वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले तर हा पुणे येथील नवीन रुजू झालेल्या टीमचा पहिलाच आणि अनोखा असा उपक्रम होता.असा हा स्तुत्य उपक्रम सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
यापुढेही ‘पैसे नको ,पण रद्दी द्या’ या उपक्रमात सहभागी होऊन आपणही रद्दी दान करू शकता असे आवाहन संस्थेच्या पुणे टीम कडून करण्यात येत आहे.त्यासाठी आपण किशोर थोरात ८७९६८२४६८२ ,अमित कोकणे ९३०७७१२५५० व महेंद्र शेळके ९६५७७१४१७१ यांना दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.
हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय