पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर: दि. १६ – रोजी डायमंड जैन सोशल ग्रुपने आपल्या सभासदांसाठी महाविद्यालयीन जीवनाचा अनुभव घेण्यासाठी बॅक टू कॉलेज या थीमवर “दिल दोस्ती दुनियादारी” हा कार्यक्रम आयोजित केला. (PCMC)
हा कार्यक्रम चिंचवड (PCMC) येथील प्रतिभा महाविद्यालयामध्ये मध्ये घेण्यात आला. बाईक रॅलीने कार्यक्रमास सुरवात झाली. यानंतर ग्रुपइव्हेंट, जुन्या विविध क्लास ऍक्टिव्हिटीज व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, एक्झामिनेशन, डिबेट कॉम्पिटिशन, कॅन्टीन व कॉलेज कट्टा हे प्रसंग नाट्यपूर्ण प्रसंग गाणी ई. कार्यक्रम सादर करण्यात आले.
यानंतर महाविद्यालयाचे आकर्षण असलेले इलेक्शनचे वातावरण तयार करण्यात आले होते. सर्व उमेदवारांनी आपला दोन मिनिट प्रचार केला व त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने वोटिंग घेण्यात आले.
ओरिएंटेशन अध्यक्ष श्री व सौ. प्रशांत गांधी श्री व सौ. सुनील शहा, श्री व सौ. नीरज शाह, धिरेन शहा, मनीषा जैन, सिद्धार्थ शहा व कमलेश चोपडा आदी मान्यवरांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. (PCMC)
हे ही वाचा
मोठी बातमी : निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू, केल्या मोठ्या घोषणा…
मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका
महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा
धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले
Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात