Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : बीट डेंग्यू मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे - डॉ. लक्ष्मण गोफणे

PCMC : बीट डेंग्यू मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे – डॉ. लक्ष्मण गोफणे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या राहत्या घराची आणि आपल्या परिसराची स्वच्छता करून डेंग्यू मुक्त शहर मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे. (PCMC)

शहराला डेंग्यू मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांनी आठवड्यात एका दिवसातील एक तास आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपल्या राहत्या घरी स्वच्छता करायची आहे. या मोहिमेअंतर्गत आज चिंचवड येथील जिजाऊ उद्यान येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अभयचंद्र दादेवार, कार्यकारी अभियंता अनुश्री कुंभार, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरुमने, डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉ. नासिर अलवी, डॉ. तृप्ती साळवे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत सांगडे, डॉ. दिनेशकुमार जाधवर, उप अभियंता दमयंती पवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, आयइसी संस्थेचे स्वयंसेवक, विविध शाळेचे विद्यार्थी आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर म्हणजेच बीट डेंग्यू (BEAT dengue) या मोहीमेत जागरूकता वाढवण्यासाठी आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. तसेच डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि डेंग्यूला रोखण हे महापालिकेचे उद्दिष्ट असून नागरी समुदायाच्या सहभाग वाढविण्यावर आणि आंतरविभागीय समन्वय राखण्यासाठी ही मोहिम उपयुक्त ठरणार आहे.


नागरिकांचा सहभाग यामध्ये महत्वाचा असून डेंग्यूला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत नागरिकांनी जागरूक असणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यानी हा संदेश आपल्या परिसरात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

बीट डेंग्यू (BEAT dengue) मोहिमेअंतर्गत संपूर्ण आठवडाभर विविध क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सोशल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आधारे आणि आरोग्य विभागाच्या आयईसी टीम्सद्वारे मोहिमेचे नेतृत्व केले जात आहे. सामुदायिक जागरूकता उपक्रमांचे नेतृत्व एमएएस, आशा आणि एएनएम करत आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ, स्वयंसेवी संस्था आणि ज्येष्ठ नागरिक मंच यांचा समावेश आहे. मॉल्स, थिएटर आणि उद्यानांमध्ये डेंग्यू जनजागृतीचे व्हिडिओ दाखविण्यात येत असून पॅम्प्लेट वितरण तसेच पथनाट्यांचे आयोजन देखील करण्यात येत आहे.

१० मिली लिटर स्वच्छ पाणी डेंग्यू आजारांचे किटक उत्पन्न करण्यासाठी पुरेसे आहे. म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत “बीट डेंग्यू’ (BEAT Dengue) ही संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये (B-Be Responsible) आपल्या आजुबाजुला डासांची निर्मिती होऊ न देणे ही आपली जबाबदारी आहे. (E- Educate Ourselves) डेंग्यू आणि इतर किटक कीटकांपासून होणार्‍या आजाराची माहिती असणे, (A-Alert PCMC) आपल्या आजुबाजुला डेंग्यू चे रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या रुग्णालयांना कळवणे, (T – Throw Away Stagnant Water) आपले घर आणि परिसरात कोठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घेत पाणी साठवणूक करणारे पात्र कोरडे करणे, व स्वच्छता करणे या गोष्टींचा समावेश आहे. (PCMC)

बीट डेंग्यू (BEAT dengue) मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. नागरिक त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचे साठे हटवून डेंग्यूचा प्रसार रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. महापालिकेसमवेत नागरिकांनी एकत्रितपणे या उपक्रमात सहभाग घेतल्याने डेंग्यूला हद्दपार करण्यास नक्कीच यश मिळेल.

डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला

मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?

Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार

ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय