Thursday, December 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:सूर्याच्या लंब रूप किरणांनी नागरिक हैराण

PCMC:सूर्याच्या लंब रूप किरणांनी नागरिक हैराण

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:शहरात सूर्याच्या लंबरूप किरणांमुळे तापमानात वाढ होऊन उकाडा असह्य झाला आहे.त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.तापमान ३४ अंश असल्याने दुपारच्या वेळी शहरातील रस्ते सुनसान होत आहेत.

सकाळी ११ वाजल्यापासून कडक ऊन पडत आहे.१२ ते ४ या बिझिनेस टाइम मध्ये रस्त्यावर तुरळक गर्दी त्यामुळे व्यवसायातील उलाढाल मंदावली आहे.मागील पाच वर्षातील सरासरी तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ झाली आहे.

पंजाब,हरियाणा राजस्थान,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या भागात सरासरी तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवड,पुणे शहरात येत्या चार-पाच दिवसांत तापमापकातील पारा आणखी वर जाण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्याने रस्ते ओस पडत आहेत.रात्रीचा थोडासा गारवारा सोडला तर दिवसा उन्हाळा सुसह्य करणारा आल्हाददायक हवा नसल्यामुळे संपूर्ण दिवस कंटाळवाणा ठरत आहे.

लोकांनी या उन्हाळ्यात बाहेर पडताना डोक्याला सुती पांढरा कपडा बांधून कान झाकावेत.ऋतुमधील या कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होउ शकतो. तीव्र उन्हामुळे त्वचा लाल होते, काळी पडते,कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते. योग्य प्रमाणात गूळ पाणी घ्यावे.मसालेदार शाकाहारी मांसाहारी टाळावा.असा तज्ञ डॉक्टर सल्ला देत आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय