Tuesday, September 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरी चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चारुशीला जोशी यांची निवड

PCMC : पिंपरी चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चारुशीला जोशी यांची निवड

उपाध्यक्ष नलावडे, सचिव रानवडे व खजिनदारपदी भुजबळ (PCMC)

पिंपरी चिंचवड / क्रांती कुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदावर चारुशिला किशोर जोशी यांची निवड करण्यात आली. सोमवारी (दि.२२) संचालक मंडळाची बैठक निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे (शहर-१) संतोष लादे यांच्या अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. (PCMC)

यावेळी सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये विजय मुरलीधर नलावडे (उपाध्यक्ष), योगेश सुर्यकांत रानवडे (सचिव) आणि विशाल बाळासाहेब भुजबळ (खजिनदार) यांचा समावेश आहे.

यावेळी पतसंस्थेचे पदाधिकारी व विद्यमान संचालक यांनी माजी अध्यक्ष झिंजुर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार विनम्र व तत्पर सेवा आणि पारदर्शकपणे काम करण्याचा संकल्प केला. तसेच सभासदांना बचतीच्या ठेवीवर ९ टक्के व्याज व कन्यादान ठेवीवर १० ते १०.५० टक्के व्याजदर करुन संस्था स्वभांडवलावर उभी करण्याचे धोरण ठरविले आहे. यामुळे सभासदांना कमीतकमी (११ टक्के) व्याज दराने कर्ज पुरवठा करणार आहे.

या पतसंस्थेची १५ वर्षापूर्वी वार्षिक उलाढाल १७ कोटी रुपयांच्या जवळपास होती. माजी अध्यक्ष झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली २० वर्षात आता पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २०९ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे व कर्ज मर्यादा ५० हजारांहून २० लाख रुपये पर्यंत वाढविली आहे. थकबाकीचे प्रमाण ०.४५ टक्के इतके अत्यल्प आहे त्यामुळे संस्थेला सतत ऑडीट वर्ग ‘अ’ वर्ग दर्जा मिळालेला आहे. (PCMC)

संस्था स्थापनेपासून सलग ५० वर्ष नफा मिळवून नफ्यातून सभासदांना जास्तीत जास्त १४ टक्के व १२ टक्के लाभांश वाटप केले आहे. संस्थेच्या सलग २५ वर्ष सभासद व सेवानिवृत्त सभासदांना बक्षिस म्हणून पाच हजार रुपये वाटप करण्यात येते. तसेच संस्थेच्या मयत सभासदांचे कर्ज माफ करणारी महाराष्ट्रातील ही पहिली पतसंस्था आहे.

यावेळी संस्थेचे विद्यमान संचालक व माजी पदाधिकारी सनी कदम, वैभव देवकर, विजया कांबळे, विश्वनाथ लांडगे, अनिल लखन, शिवाजी येळवंडे, संदीप कापसे, नथा मातेरे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, कृष्णा पारगे, गणेश गवळी, अभिषेक फुगे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय मुंडे, युनुस पगडीवाले व संस्थेचे सल्लागार मनोज माछरे, नितीन समगीर, संजय कापसे, मंगेश कलापुरे, उमेश बांदल, चंद्रशेखर गावडे, विशाल बाणेकर व प्रभागातील संघटनेचे पदाधिकारी व व्यवस्थापक प्रल्हाद सुतार तसेच महासंघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

नागपूरसह विदर्भात अतिवृष्टी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

आरक्षण विरोधी आंदोलनात 114 मृत्यू, देशभर संचारबंदी

Marriage certificate : विवाह प्रमाणपत्र कसे काढावे? हे आहेत फायदे!

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे हमीभाव ठरवा – संयुक्त किसान मोर्चाची मागणी

जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड, महामार्ग बंद

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी २५ हजार कोटींची तरतूद – उपमुख्यमंत्री अजित पवार

आयुक्त शेखर सिंह यांच्यासह महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केली, राहत्या घराची स्वच्छता

संबंधित लेख

लोकप्रिय