Thursday, July 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शहरातील पबची संस्कृती हद्दपार करा, अन्यथा आंदोलन - सचिन चिखले

PCMC : शहरातील पबची संस्कृती हद्दपार करा, अन्यथा आंदोलन – सचिन चिखले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्त्यावर उतरण्याचा (MNS) इशारा PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : नुकत्या काही दिवसापुर्वी पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एका पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा काही दिवसात इतर भागातील व्हिडिओ समोर आले आहेत. नुकतेच पुण्यातील फक्त २३ पबला कायदेशीर परवानगी आहे आणि प्रत्यक्षात १४४ सुरु होते हि आकडेवारी उघडकीस आली आहे. pcmc

पिंपरी चिंचवड शहरातील पबची पाश्चिमात्य संस्कृती तातडीने हद्दपार करा. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिमा मलिन होत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड हे विद्येचे माहेरघर आणि वारकरी संप्रदायाची संस्कृती असलेले शहर आहे. अनेक मान्यवर प्रतिष्ठीत माता मंडळी या शहरात वास्तव्याला आहेत. PCMC

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन चिखले यांनी शहरातील पाश्चिमात्य विकृत संस्कृती आणि या पबमध्ये अवैध धंदे सुरू आहेत, यावर आवश्यक कायदेशीर ती कारवाई तातडीने कारावी, अशी मागणी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचेकडे कडे केली आहे. pcmc


याबाबत प्रसिद्धीपत्रकात सचिन चिखले यांनी म्हटले आहे की, पोलिस आणि महानगरपालिका आयुक्त यांनी संयुक्तपणे शहरातील हॅाटेलच्या नावाखाली पबचे अवैध धंदे व हॅाटेलचे अनधिकृत बांधकामाची तसेच (टॅक्स) कराबाबतची चौकशी करून त्वरित कारवाई करावी. PCMC

पबमध्ये अवैध्य धंदे सुरू असलेल्या काही भागात हिंजवडी, वाकड, सौदागर पिंपळे इत्यादी काही भागात नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे आपल्या पिंपरी चिंचवड शहरी भागातील पबवरती पोलिसांनी त्वरित कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने केली आहे. (Ban culture of pubs in the city, or protest – Sachin Chikhle)

आपणास सांगण्यात येते की हा विषय अत्यंत गंभीर असून, पोलिसांनी पिंपरी चिंचवड शहरामधिल पब संस्कृतीच हद्दपार केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. जर पोलिसांनी या शहरातील पब विरोधात सगळ्यांना दिसेल अशी कारवाई केली नाही, तर मात्र आम्ही पिं.चिं.मनसे रस्त्यावर उतरू याची नोंद घ्यावी. असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या संदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय