Thursday, April 3, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC:तळवडे आगीच्या दुर्घटनेतील मृत, जखमींच्या नातेवाईकांना मदतीचा हात

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२२- माजी नगरसेवक शांताराम कोंडीबा भालेकर उर्फ एस.के.बापू यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तळवडे-ज्योतीबानगर येथील स्पार्कल कॅण्डल कंपनीतील दुर्घटनेत मृत व जखमी झालेल्या १५ जणांच्या कुटूंबियांना लोकवर्गणीतून प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे १५ लाख रुपयांची मदत शुक्रवारी (ता. २२) देण्यात आली.

देणगीदार, उद्योजक व मान्यवर यांच्या हस्ते हि मदत संबंधितांना सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी संगीता भालेकर, के.डी. वाघमारे, सुजाता काटे मामी, शितलताई वर्णेकर, विठ्ठल निवृत्ती भालेकर, अरुण थोपटे, देवी इंद्रायणीचे बिर्जे , रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष वसंत पतंगे गुरुजी, घरजाईमाता ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष गौतम मोकाशे यांनी मनोगत व्यक्त केले.
भोसरी विधानसभेचे आमदार पैलवान महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे म्हणाले कि,
शांताराम बापू भालेकर हे माझ्याकडे वार्डातील समस्या घेऊन येत असतात. एक समस्या सोडवून झाल्यानंतर पुढील दोन समस्या त्यांच्याकडे तयार असतात अशा प्रकारे वार्डातील त्या समस्या तळमळीने सोडून घेण्याचा पाठपुरवठा करून समस्या मार्गी लावतात .
शांताराम बाप्पू भालेकर यांनी प्रास्ताविकामध्ये वाढदिवसाच्या औचित्य साधून कुठल्याही प्रकारचा ऑर्केस्ट्रा व इतर मनोरंजनाचा कार्यक्रम टाळून, आपण समाजकार्य करत असताना समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही संकल्पना डोळ्यापुढे ठेवून दुर्घटनेतील कुटुंबीयांच्या वारसांना लोकवर्गणीतून आर्थिक मदत देण्याचा मानस पूर्ण केला.

या कार्यक्रमास उपस्थित मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, भोसरी विधानसभेचे आमदार पै. महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक राजू गोलांडे, प्रशांत शितोळे, नगरसेवक नारायण बहिरवडे, नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्यासह पांडुरंग भालेकर, तळवडे गावातील ग्रामस्थ, तरुण वर्ग, सर्व ज्येष्ठ नागरिक व त्याप्रमाणे महिला-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles