Saturday, July 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ई. ८ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी...

PCMC : ई. ८ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींना सायकल खरेदीसाठी देणार ७ हजार रुपये

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहरातील इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींना महिला व बाल कल्याण योजनेच्या माध्यमातून सायकल खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ७ हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. PCMC

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन समाजविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले आहे. pcmc

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना तसेच विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

त्यापैकी महिला व बालकल्याण या योजनेअंतर्गत महापालिकेच्या हद्दीतील खासगी आणि महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या ८ वी ते १० वीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनींना सायकल खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ७ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. pcmc

महिला व बाल कल्याण योजनेचा लाभ लाभार्थींना देण्यासाठी २०२४-२०२५ या आर्थिक वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी www.pcmcindia.gov.in या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील समाज विकास विभाग योजना या पर्यायावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे. तरी लाभार्थींनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. Pcmc

योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थिनींना मागील वर्षी किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. प्रमाणपत्रावर सरासरी श्रेयांक पद्धतीने गुण (सीजीपीए) उपलब्ध असतील तर सरासरी श्रेयांक गुण (सीजीपीए) ५.३ एवढे असणे आवश्यक आहे, पिंपरी चिंचवड हद्दीतील लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

अर्जदाराने आधारकार्डची प्रत आणि पालकांचे मतदान कार्ड किंवा मतदान यादीची प्रत जोडणे बंधनकारक आहे.

लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

ऑनलाईन अर्ज भरताना तहसीलदाराकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला किंवा रेशनकार्ड जोडावे.
अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असून विभागात आलेले कोणतेही अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय