Photo : khan sir (Twitter) |
पटना : बिहार मधील रेल्वे भरतीच्या RRB-NTPC परीक्षेच्या निकालावरून सध्या वाद सुरू आहे, या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी बिहार मधील विविध रेल्वे स्थानकावर आंदोलन केले, मात्र या आंदोलनाला हिंसकवळण लागले. हिंसेप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन
२४ जानेवारी रोजी राजेंद्र नगर रेल्वे स्थानकावर सुमारे ५ तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी दगडफेक, जाळपोळ अशा घटनाही घडल्या. या प्रकरणी विद्यार्थ्यांना भडकवल्याच्या आरोपावरून पाटणातील प्रसिध्द खान सर यांच्यासह अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शिक्षकांविरुद्ध आणि ४०० अज्ञातांविरूध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पटनातील पत्रकार नगर ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
खासदार अमोल कोल्हे यांच्या कार्यालय व घरासमोर ‘सविनय आंदोलन’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ फुटेज आणि घटनास्थळावरून अटक केलेल्यांच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.
अध्यापकों पर FIR निंदनीय है, इसे तुरंत वापिस लिया जाना चाहिए । ध्यान बच्चों की समस्याओं को जल्दी से निपटाने पर होना चाहिए ना की अध्यापकों को फ़र्ज़ी में फ़साने पर । ?
#khansir https://t.co/k8U5WBZyvk— Rahul Prasad (@pr38166758) January 27, 2022
ब्रेकिंग : भाजप आमदार नितेश राणे यांना दहा दिवसांत कोर्टासमोर शरण याव लागणार
दरम्यान, खान सरांच्या समर्थनात आणि त्याच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी ट्वीटरवर #khansir हा ट्रेंड चालविला जात आहे.
दुपारी हा ट्रेंड एक नंबरवर पाहायला मिळाला.
इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा