परभणी : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) चे ४ थे जिल्हाधिवेशन आज परभणी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल भवन येथे संपन्न झाले.
परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून डी वाय एफ आय चे तरुण या अधिवेशनाला उपस्थित होते. शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांना घेऊन जिल्ह्यातील युवक व विद्यार्थ्यांना संघटित करीत शासकीय धोरणांवरती दबाव गट म्हणून तरुणांची एक सामूहिक शक्ती एकत्रित करण्याचा डीवायएफआय चा निर्धार आहे.
या अधिवेशनात डीवायएफआय च्या नवीन समितीची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष म्हणून कॉ.सुनील तारे, जिल्हासचिव कॉ.नसीर शेख यांची फेरनिवड, जिल्हाउपाध्यक्ष अमन जोंधळे, क्रांती बुरकुंडे, जिल्हासहसचिव अक्षय महाडिक, नितीन चौधरी आणि कोषाध्यक्ष म्हणून जय एंगडे तर सदस्य म्हणून अनिल मुळे, सुधीर पौळ, सचिन नरनवरे, अजय खंदारे, संग्राम नजान, दत्ता श्रावणे आदींची निवड करण्यात आली.
अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएफआय च्या राज्य सचिव प्रीती शेखर उपस्थित होत्या तर या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हासचिव कॉ.उद्धव पौळ, शेतमजूर युनियन चे जिल्हाप्रमुख अशोक बुरकुंडे, सीआयटीयु (CITU) या कामगार संघटनेचे चे जिल्हासचिव कॉ.रामराजे महाडिक आणि जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाप्रमुख कॉ. दुर्गा शेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डी वाय एफ आय च्या नवनियुक्त समितीकडून बेरोजगारी विरुद्ध तीव्र आंदोलन उभारण्याचा ठराव सुद्धा घेण्यात आला.