Saturday, October 12, 2024
Homeग्रामीणविधवा महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून साजरा केला महिला दिन

विधवा महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून साजरा केला महिला दिन

अहमदनगर : ग्रामीण विकास केंद्र, जामखेड कोरो मुंबई व इकोनेट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पारगाव सुद्रिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला प्रबोधन मेळावा साजरा करण्यात आला.

विधवा महिलांच्या हस्ते ज्ञानज्योत पेटून कार्यक्रम सुरू करण्यात आला व प्रतिमापूजन करण्यात आले, आपण पाहतो,समाजामधे संस्कृतीनुसार विधवा महिलेला हळदी कुंकू लावता येत नाही त्यांच्या हस्ते कोणतेच उद्घाटन वा शुभ कार्य सुरू करत नाहीत. विधवा महिलांना लग्नात नवरदेव नवरीला हळद लावता येत नाही. हळद लावून दिली जात नाही अशा जाचक प्रथांना आज ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विधवा महिलेकडून कुंकू लावून घेतले व विधवा महिलांच्या डोक्याला गजरे लावले आणि अशा सामाजिक प्रथांना  कायमची श्रद्धांजली दिली. 

या ग्रामीण विकास केंद्र  संस्थेच्या अनोख्या उपक्रमाचे डॉ. प्रणोती राहुल जगताप, संचालक कुं. रा.सहकारी साखर कारखाना यांनी कौतुक केले. उपस्थित महिलांना शिक्षण व आरोग्याचे महत्त्व सांगितले आणि आपण सगळे एक आहोत काही मदत लागली तर कोणताही संकोच न बाळगता माझ्याशी संपर्क साधा अशी भरीव आणि आपल्या पणाची  जाणीव माईंनी उपस्थित महिलांना करून दिली.

तर प्रा. स्मिता सोनवणे यांनी विधवा महिलेला समाजात वावरत असताना किती त्रास होतो हे स्वतःच्या अनुभवातून उपस्थित महिलांना भारावलेल्या डोळ्यानं सांगितलं.

उपस्थित सर्व महीला ते ऐकून भारावून गेल्या.

विधवा महिलांना त्या जिवंत आहेत याची जाणीव आणि त्यांना त्यांच्यावर लादलेल्या  बंधनातून मुक्त करण्याचे काम ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे कार्यकर्ते करत आहेत व करत राहतील असे बोलताना ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ म्हणाले. रोहिणी जौंजाळ बोलताना  म्हणाल्या की विधवा महिलांनी खचून न जाता त्याच उमेदीने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे असे प्रबोधन केले. पल्लवी शेलार, सावंत लता, छाया भोसले यांनी प्रबोधन पर गीत सादर केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारगाव सुद्रिक येथील ग्रामस्थ आणि जी.व्ही.के. चे जालिंदर शिंदे, मनीषा काळे, सुनिता बनकर, राहुल कोठारे यांनी सहकार्य केले या कार्यक्रमासाठी राजेंद्र मोटे, भाऊसाहेब बोटे, मंगेश घोडके, शिवाजी गोरखे, कृष्ण सरगर, प्रतिभा उंडे, शितल शिर्के, स्नेहा मोटे, सुषमा मोटे, उपस्थित होते. सूत्रसंचालन उज्वला मदने तर आभार संतोष भोसले यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय