पुणे : अखिल भारतीय किसान सभेने रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी जुन्नर, आंबेगाव, शिरुर तालुक्यातून पायी मोर्चा काढला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर बैठका घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते.
प्रशासनाने आश्वासन पाळत उपविभागीय बैठकीचे आयोजन केले आहे. किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत उद्या मंचर येथे अस्मिता भवन येथे बैठक होणार आहे. सदर बैठकीस उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना), उपविभागीय अधिकारी, तालुका प्रशासन तसेच किसान सभेचे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे, उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, जुन्नर तालुका अध्यक्ष डॉ. मंगेश मांडवे, राजू घोडे, जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, उपाध्यक्ष विलास डावखर, मुकुंद घोडे आदीसह उपस्थित राहणार आहेत.