Monday, December 23, 2024
Homeराज्यपरीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा देण्याची संधी !

परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा देण्याची संधी !

मुंबई : महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरु आहेत . पूरस्थिती , कोरोना , तांत्रिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाची परीक्षा देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

तसेच विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षांबाबत काही ठिकाणी आलेल्या अडचणींबाबत चौकशी करून परीक्षा घेणाऱ्या संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी चार सदस्यीय सत्यशोधन समिती गठित करण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सीईटी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. शुक्रवारी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मुंबई, पुणे, अमरावती, सोलापूर या विद्यापीठात विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरं जावं लागलं ही बाब आमच्या लक्षात आली आहे.

काही प्रमाणात आढावा घेताना समजलं की परीक्षा घेताना काही त्रुटी राहिल्या आहेत . पूरस्थिती , कोरोना आणि तांत्रिक अडचणींमुळे ज्यांना परीक्षा देता आल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांना १० नोव्हेंबरपूर्वी परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय