Monday, June 24, 2024
Homeजिल्हाबार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जेईई आणि नीट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांच्या निःशुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रीया सुरु करण्यात आली असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी दिली आहे. (barti)

बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईईसाठी १०० व नीटसाठी १०० जागांकरिता प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. उमेदवारांने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता ११ (विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांजवळ राज्यातील अनुसूचित जातीचा व अधिवास दाखला असावा.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापर्यंत असावे. विद्यार्थी दिव्यांग असल्यास ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक राहिल. अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे.

प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने इयत्ता १० वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तानिहाय निवड केली जाईल. प्रशिक्षणासाठी महिला ३० टक्के, दिव्यांग ५ टक्के, अनाथ १ टक्का, वंचितमध्ये वाल्मिकी व तत्सम जाती, होलार, बेरड, मातंग, मांग, मादगी इत्यादीसाठी ५ टक्के जागा आरक्षित असतील.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. प्रशिक्षण कालावधी २४ महिन्यांचा राहिल. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधीसाठी उपस्थित राहिल्यास त्या विद्यार्थ्यांना दरमहा ६ हजार रूपये विद्यावेतन अदा करण्यात येईल. निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना पुस्तक संचाकरिता प्रती विद्यार्थी ५ हजार रूपये इतकी एकरकमी रक्कम अदा करण्यात येईल.

योजनेबाबत व प्रशिक्षणाबाबत काही वाद अथवा धोरणात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यास याबाबतचे सर्व अंतिम अधिकार शासनास व बार्टीचे महासंचालक यांना राहतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी १३ जून पासून http://jee-neet.barti.co.in/public/ या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहनही वारे यांनी केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय