Saturday, December 14, 2024
Homeताज्या बातम्याOne Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

One Nation One Election : देशभरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ म्हणजेच एक देश-एक निवडणुकीच्या धोरणाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली असून, लवकरच हे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. संसदीय समिती स्थापन करून सर्व पक्षांची मते जाणून घेतल्यानंतरच हे विधेयक संसदेत सादर केले जाईल.

लोकसभा आणि राज्यसभेत एनडीएचे बहुमत असल्यामुळे एनडीएमधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्यास हे विधेयक सहज संमत होऊ शकते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीने या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ म्हणजे देशातील लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचे धोरण. यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारा वेळ, खर्च आणि प्रशासनाची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनंतर या धोरणाला अधिकृत मान्यता मिळाली आहे. आता संसदेच्या मंजुरीनंतर हे धोरण लागू होणार असल्याने देशातील निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

One Nation One Election

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास

Fire : तामिळनाडूत हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 7 ठार

महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर

धक्कादायक : पत्नीच्या छळाला कंटाळून इंजिनियरची आत्महत्या, तब्बल 24 पानांची लिहली सुसाईड नोट

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर, शाळांच्या वेळेत बदल

मोठी बातमी : ‘वेलकम’ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्याचे अपहरण, खंडणीसाठी 12 तास टॉर्चर

ब्रेकिंग : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या विविध परिक्षांचा निकाल जाहीर

बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणाऱ्या कंपनीच्या सूत्रधारास अटक

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय