पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर- मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या शहराच्या वतीने समाजातील शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय व सामाजिक प्रश्न समजाऊन घेऊन अडीअडचणी प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे यांच्या नेतृत्वाखाली मोरेवस्ती. चिखली,मोरेवस्ती या ठिकाणी पैलवान विठ्ठल शिंदे यांच्या निवासस्थानी गोधडी बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दरम्यान समाजातील युवक पत्रकार माणिक पौळ यांनी समाज बांधवांची होत असलेली आर्थिक फसवणूक व त्यावर समाजाने लक्ष घालून तोडगा काढण्यासाठी लक्ष वेधले, राजु आवळे यांनी समाजामध्ये वाढत चाललेली बेरोजगारी, दारू वेसन, तसेच युवकांचे वैचारिक शिबिर लावण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली, पैलवान विठ्ठल शिंदे यांनी समाजातील युवक व युवतींना खेळाडू करण्यासाठी प्रामुख्याने कुस्ती खेळाडु यांची होत असलेली कुचंबणा तसेच राजकीय वापर कसा केला जातो ही बाब निदर्शनास आणून दिली.
उद्योजक अनिल गायकवाड यांनी या बैठकीत समाज बांधवाची उपासमारी होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच बेरोजगारांना आपण शासनाच्या माध्यमातून सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास दिला. माजी अध्यक्ष डी पी खंडाळे यांनी कोणतीही समाजाचे प्रश्न अनुत्तरित राहणार नाही असा विश्वास दिला.
माजी अध्यक्षा आशा शहाणे व सविता आव्हाड यांनी महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात यावा तसेच माता भगिनींच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची सूचना केली.
याप्रसंगी आण्णासाहेब कसबे, चंद्रकांत दादा लोंढे व लोकसेवक युवराज दाखले यांनी आपल्या मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक तसेच सामाजिक उत्कर्षासाठी सदैव कटिबध्द राहणार असल्याचे वचन दिले.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे क्रांतीगुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाने कुस्ती संकुल युवकांना व युवतींना प्रशिक्षण चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन दिले.
यावेळी माजी अध्यक्ष डी पी खंडाळे, संपत आबासाहेब मांढरे, उद्योजक अनिल गायकवाड, शिवाजीराव खडसे, माणिक पौळ, गणेश कलवले, सविता ताई आव्हाड, आशाताई शहाणे, रेखाताई दुनगव, मिराताई अल्लाट,अशाताई गायकवाड,शंकर खुडे, लक्ष्मण शिंदे, हनुमंत शिंदे, रामेश्वर बावणे, विठ्ठल शिंदे साहेबराव जोगदंड श्रेश लाटकर , अविनाश शिंदे,राजु आवळे, चंद्रकांत दादा लोंढे, युवराज दाखले, मनोज खवळे, आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान पुढील गोदडी बैठक आज रविवारी दिनांक 24-12-2023रोजी लाल टोपी नगर, मोरवाडी या ठिकाणी आहे तरी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे अहवान अविनाश शिंदे यांनी केले.