Monday, December 23, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडव्हिडिओ : नारायण हट सहकारी गृह संस्थेचा स्तुत्य उपक्रम - उपक्रमास उस्फूर्त...

व्हिडिओ : नारायण हट सहकारी गृह संस्थेचा स्तुत्य उपक्रम – उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद !

पुणे : “माझी सोसायटी माझी जबाबदारी”! “तसेच माझी शाळा  माझे कर्तव्य!” या भूमिकेतून भोसरी येथील नारायण हट सहकारी गृह संस्थेअंतर्गत सन २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षात सुरू होणाऱ्या शिशुवर्ग शाळा प्रांगणात (अडीच एकराच्या परिसरात)  रविवार दिनांक २७ रोजी सकाळी ८ ते १०:००या वेळेत श्रमदान व परिसर स्वच्छता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात सोसायटीमधील बहुसंख्य सभासद सह-कुटुंब सहभागी झाले होते. वृद्ध, महिला, पुरुष, तरुण मोठ्या संख्येने श्रमदानासाठी उपस्थित होते. 

श्रमदानाची सुरुवात सोसायटीतील ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली. श्रमदानासाठी सहभागी सभासदांनी आपल्याबरोबर स्वतःचे खराटा -झाडू, विळा, खुरपे, घमेले, खोरे, टिकाव, कुदळ, यापैकी जे उपलब्ध साहित्य असेल ते बरोबर घेऊन सहभागी झाले.

श्रमदान हेच सर्वश्रेष्ठ दान ! यानुसार छोटासा प्रयत्न सोसायटीच्या अंतर्गत २०२२-२३ या वर्षात जून महिन्यात सुरू होणाऱ्या शिशुवर्ग शाळेच्या प्रांगणात हे श्रमदान करण्यात आले. नारायण हटगृह संस्थेअंतर्गत  शाळेसाठी अडीच एकर एवढा मोठा परिसर उपलब्ध असून इमारत बांधून तयार आहे. या इमारतीत ही शाळा सुरू होणार असून भविष्यात टप्प्याटप्प्याने पुढचे वर्ग सुरू होणार आहेत. ही शाळा सुरू होण्याने भविष्यात या परिसरातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. 

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

ब्रेकिंग : इंधन दरवाढीचा भडका, पेट्रोल डिझेल दरात आज पुन्हा वाढ

येत्या जून मध्ये शिशू वर्ग सुरू होणार असून त्यासाठीची ॲडमिशन प्रक्रिया एक तारखे पासून (१ एप्रिल२०२२ पासून) सुरू होणार आहे. म्हणून ॲडमिशन प्रक्रिया सुरू करण्या आधी शालेय परिसर सोसायटीच्या सभासदांच्या श्रमदानातून स्वच्छ करावा. या हेतूने सोसायटीतील सर्व सभासदांनी विचार विनिमय करून शालेय परिसरात श्रमदान व परिसर स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रमदाना अंतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या शालेय परिसरात दोन तास श्रमदान करून स्वच्छता करण्यात आला.

भोसरी परिसरातील नारायणहट सहकारी गृह संस्था ही प्रसिद्ध गृह सोसायटी असून गृह संस्थेअंतर्गत स्वतःची शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षणाचे कार्य करणारी ही वेगळी संस्था ठरणार आहे. सोसायटी अंतर्गत  नव्याने सुरू होण-ऱ्या शाळे मुळे सोसायटी व आजूबाजूच्या परिसरातील मुलांना जवळच दर्जेदार दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्यार आहे.

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

ज्ञान प्रबोधनी, निगडी मार्गदर्शित ही शाळा सुरु करून तेथील सर्व उपक्रम राबविण्याचा मानस शिक्षण संस्थेच्या संचालकांचा आहे. चांगल्या शैक्षणिक कार्याचीसुरुवात श्रमदानातून करण्यासाठी सोसायटीने केलेला. हा एक प्रयत्न निश्चित इतरांना प्रेरणादायी आहे.

शाळा परिसर स्वच्छता व श्रमदान कार्यक्रमात सहभागी झालेल्या सभासदांमध्ये ज्ञानेश्वर सावंत, संदीप बेंडुरे, मुकुंदराव आवटे, शिवराम काळे, संजयराव सांगळे, रोहिदास गैंद, उज्वला थिटे, रोहिणी पवार, अंकुशराव गोरडे, प्रा. डॉ. वसंतराव गावडे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, यशवंतराव नेहरे, रामदास गाढवे, शंकरराव पवार, सचिन बो-हाडे, अमोल मुळुक, बाळासाहेब मुळूक, तनिष अल्हाट, अनिता सांगळे, वैशाली गावडे यांनी या उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले.

सावधान ! राज्यातील “या” जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

संबंधित लेख

लोकप्रिय