Sunday, December 22, 2024
Homeजिल्हा...आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फिरण्यासाठी मोजावे लागणार पैसे !

…आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात फिरण्यासाठी मोजावे लागणार पैसे !

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी येऊ इच्छित असाल तर थांबा. पहिल्यांदा हजार रुपये मासिक शुल्क विद्यापीठ प्रशासनाकडे जमा करा मगच तुम्हांला प्रवेश मिळेल. याबाबतचे परिपत्रक कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी शुक्रवारी सांयकाळी काढले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एसपीपीयू ऑक्सी पार्क ही योजना जाहीर केली आहे. त्याअंतर्गत आता विद्यापीठात सकाळ व संध्याकाळी प्रवेश करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. मासिक शुल्क 1 हजार रुपये, सहामाही शुल्क 5 हजार 500 व वार्षिक शुल्क दहा हजार रुपये आकारण्यात येणार आहे. हे शुल्क भरणाऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्यांनाच विद्यापीठात प्रवेश दिला जाईल.

याबाबत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू एन. एस. उमराणी यांनी सांगितले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला आहे. तुम्हांला विद्यापीठात शुल्क न भरता प्रवेश करायचा असेल तर प्रस्ताव द्या, कमिटी त्यावर विचार करेल.


संबंधित लेख

लोकप्रिय