सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने पुन्हा दणका दिला आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. आज, सत्र न्यायालयाने यावर निकाल दिला. त्यावेळी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. राणे कोर्टाबाहेर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडवल्याने कोर्टाबाहेर राडा बघायला मिळाला.
कोरोनाचे निर्बंध हटविण्यास सुरूवात, राज्य सरकारने केली नवीन नियमावली जाहीर
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास सांगितले होते, तसेच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असेही निर्देश दिले होते. त्यानुसार नितेश राणे हे जिल्हा न्यायालया समोर हजर होत अटकपूर्व जामीन अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने आता नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आता नितेश राणे पुन्हा हायकोर्टात धाव घेणार आहे.
ब्रेकिंग : देशाचे अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पाने जनतेला काय दिले वाचा एका क्लिकवर !
न्यायालया बाहेर राडा
न्यायालयाच्या निकालानंतर सत्र न्यायालया बाहेर मोठा ड्रामा बघायला मिळाला. राणे कोर्टाबाहेर आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडवून धरली होती. त्यामुळे निलेश राणे संतप्त झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले असताना आमची गाडी अडवूच कशी शकतात, असा सवाल निलेश राणे यांनी विचारला. यावेळी न्यायालया बाहेर मोठा राडा बघायला मिळाला.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!
काय आहे प्रकरण ?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या वेळी 18 डिसेंबर 2021 रोजी शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते.
मॉल्समध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा – जनवादी महिला संघटना आक्रमक
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !