वृत्तपत्र पत्रलेखन कार्यशाळेत बोलताना ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे व मंचावर अन्य मान्यवर |
इचलकरंजी ता. ६ : समाजकारण अधिकाधिक सुदृढ होण्यासाठी मराठी वृत्तपत्र माध्यमांचे योगदान मोठे आहे. पत्रकारितेत आणि माध्यमात काळानुसार बदल होत गेले. मात्र त्यातील समजमानसाचे प्रतिबिंब नेहमीच महत्त्वाचे ठरत आले आहे. प्रगल्भ व विकसित पत्रकारिता अतिशय गरजेची असून त्यामध्ये सुजाण वाचकवर्गाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. म्हणूनच समाजातील जबाबदार घटक म्हणून आपला व्यक्त होण्याचा अधिकार वाचकपत्रातून नव्या पिढीने बजावला पाहिजेअसे मत ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांनी व्यक्त केले. ते पत्रकार दिनानिमित्त आयोजित वृत्तपत्र पत्रलेखन कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अनिल पाटील होते. यावेळी प्रसाद कुलकर्णी, पांडुरंग पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्रीमती आ.रा. पाटील कन्या महाविद्यालय, समाजवादी प्रबोधिनी आणि वृत्तपत्र पत्रलेखक संघ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. सुभाष जाधव यांनी करून दिला.
लिपारे पुढे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरानी दर्पण हे मराठीतील पाहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ साली सुरु केले व सामाजिक प्रश्नांना वाचा फॊडण्याचे कार्य सुरु झाले. जांभेकराचे कार्य हे खूप मोठे असून त्या कार्यातील त्याची पत्रकारिता हा एक घटक आहे. वृत्तपत्र छपाईसाठी येणारा खर्च आणि विक्रीतून येणारे उत्पन्न यांचा मेळ घालत कार्य करावे लागते. पत्रकारिता निप:क्षपणे कार्यरत असावी अशी समाजाची भूमिका असते. मात्र परिस्थतीनुरूप काही निर्णय पत्रकारांना घ्यावे लागतात. वृत्तपत्रातुन एखादंया प्रश्नाला गती देण्याचे काम तसेच एखादे काम बंद करण्याची ताकद वृत्तपत्रामध्ये असते. दयानंद लिपारे यांनी आपल्या मांडणीतून दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कार्यकर्तृत्व ,मराठी वृत्तपत्रांचा इतिहास व परंपरा आणि वृत्तपत्रातील वृत्तपत्रपत्रलेखनाचे महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
वृत्तपत्र पत्रलेखन तितकेच महत्वाचे – प्रसाद कुलकर्णी
प्रसाद कुलकर्णी यांनी वृत्तपत्र हे समाज माध्यम आहे. त्याचा लोकजागृतीसाठी वापर कसा करावा, आजच्या महत्वाच्या विषयांवर पत्रलेखन कसे करावे, त्यातील चिकित्सक गोष्टीकडे कसे पहावे आणि एकूणच सामाजिक घटक म्हणून केला जाणारा हस्तक्षेप अशा विविध मुद्यांवर मत मांडले. पांडुरंग पिसे यांनी उपस्थितांना वृत्तपत्र पत्रलेखन विभागामध्ये लेखन कसे करावे या विषयी मार्गदर्शन करत शंकांचे निरसन केले.
प्राचार्य डॉ.अनिल पाटील अध्यक्षीय मनॊगत व्यक्त
करताना म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरानी दर्पण वर्त्तपत्र सुरु करून समाजातील प्रश्नाचा आरसा कसा असतो हे त्या वृत्तपत्राच्या शीर्षकातून सिद्ध करून दाखवले आहे . हे स्पष्ट करत बाळशास्त्री जांभेकराच्या कार्यावर प्रकाश टाकला.
आभार प्रा. प्रतिभा पैलवान यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रियांका कुंभार यांनी केले. या कार्यशाळेला प्राध्यापक वृंद व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.