Wednesday, February 19, 2025

दादा चटर्जी हे कामगारांचे उर्जास्थान – काशिनाथ नखाते

दादा चटर्जी यांना अभिवादन करताना मान्यवर

पिंपरी दि. ६ : अभ्यासू व्यक्तिमत्व अत्यंत साधी राहणी व उच्च विचार कामगाराप्रति असलेली आस्था  यामुळे अहोरात्र प्रयत्न करून एकेक कंपन्या जोडून कामगार शक्ती उभी करून त्यांना न्याय देण्याची भूमिका दादा रुपमय चटर्जी यांनी घेतली आणि तत्कालीन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम उभे केले. दादा चटर्जी कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात राहतील, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

भोसरी येथील पुतळ्याला कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे कामगार शत्रुघ्न जाधव यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी सलीम डांगे, ओमप्रकाश मोरया, सिकंदर शेख, सुरज देशमाने, किरण साडेकर, निरंजन लोखंडे आदी उपस्थित होते.

दादा रूपमय  चॅटर्जी यांनी एच ए, बजाज ऑटो, सँडविक, के एस बी पंप आधी सारख्या  कामगाराना एकत्र करून त्यांच्या वेतनाची लढाई आणि हक्काची लढाई यशस्वीरित्या लढली. दादांच्या साधे राहणीमान आणि त्यांच्या खोलीमध्ये केवळ कामगार कायदे आणि कामगार हिताचे पुस्तकं असायची अत्यंत अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व हे अल्पावधीत नावलौकिक मिळालं होतं. परंतु या शहराचे दुर्दैव म्हणावे लागेल की ते  लवकर शहीद झाले ते अजून राहिले असते तर शहरातील कामगाराला मोठ्या प्रमाणात न्याय मिळाला असता असे नखाते म्हणाले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles