हडपसर / डॉ. अतुल चौरे : एस. एम. जोशी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील युवक युवतींसाठी नव मतदार नाव नोंदणी अभियान संपन्न झाले. New voter name registration campaign for youths completed in SM Joshi College
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तेजस्विनी गदादे, विजयकुमार वाबळे व रमेश बिरदवडे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तेजस्विनी गदादे म्हणाल्या की, महाविद्यालयातील युवकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती त्यांनी दिली. तसेच मतदार ओळखपत्राची गरज व महत्त्व विशद केले. भारतीय लोकशाहीसाठी मतदानाचे महत्त्व ओघवत्या भाषेत विशद केले. तसेच मतदार ओळखपत्रातील माहिती चुकीची असेल तर त्यामध्ये दुरुस्ती कशी करावी याबद्दल माहिती दिली.
युवकांसाठी नवमतदार नाव नोंदणी उपक्रम घेण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिनकर मुरकुटे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व सत्कार उपप्राचार्य डॉ.संजय जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृता मुखेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अतुल चौरे यांनी मानले. नवमतदार नाव नोंदणीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उपप्राचार्य डॉ किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, डॉ. निशा गोसावी, ऋषिकेश खोडदे, प्रा.महेश देवकर तसेच सर्व विभागातील विभागप्रमुख, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.