Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

मुंबई : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना फोडली. आजवर झालेलं हे सर्वात मोठं बंड होतं. याला आता एक वर्ष होत असताना उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या रणरागिनी, पीडित महिलांचा आवाज म्हणून ओळख असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

---Advertisement---

एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला हा मोठा धक्का दिला आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हेंकडे बघितलं जातं. असे असताना आता त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान, आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या होत्या. त्यांचा मोबाईलही नॉट रिचेबल येत होता. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत.

---Advertisement---

सुषमा अंधारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यापासून अनेक महिला नेत्यांची नाराजी होती. त्यांच्या प्रवेशानंतर दीपाली सय्यद, मनिषा कायंदे आणि आता नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हे ही वाचा :

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार

आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles