मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आला आहे. या पार्श्वभूमीवर देशात 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी अद्याप कोणत्याही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र विरोधी पक्षांचा राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे केले जात आहे, यावर सर्वपक्षीयांचे एकमत देखील आहे. आता यावर शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, ‘या’ 500 जागांसाठी होणार भरती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत सांगितले की, ‘मी शर्यतीत नाही, मी राष्ट्रपतीपदाचा विरोधी उमेदवार असणार नाही.’ राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांना आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने पाठिंबा दिला होता. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत पवार आघाडीवर असल्याचे मानले जात होते. त्याचवेळी अनेक लहान-मोठे राजकीय पक्ष त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत असल्याच्या बातम्या येत असताना आता शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी तयारी सुरू केली असून विरोधकांची दिल्लीत उद्या 15 जून रोजी बैठक होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला असून २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. या बैठकीत विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.
कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी