पिंपरी चिंचवड : राज्याचे लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे शिवाजीराव आढळराव पाटलांवर निशाणा साधला आहे. (Amol Kolhe On Shivajirao Adhalrao Patil)
ज्या व्यक्तीच्या विरोधात गेल्या 20 वर्षे संघर्ष केला, तिलाच राष्ट्रवादी ने आयात केलं, असे असल्यास विलास लांडे हे नाराज होणे स्वाभाविक असल्याचं मत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. (Shirur Lok Sabha Election 2024)
कोल्हे यांनी शिरूर लोकसभेचा भाग असलेल्या भोसरीमध्ये सुट्ट्यांच औचित्य साधून मतदारांपर्यंत पोहोचत प्रचार केला. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विलास लांडे यांच्या नाराजीवर स्पष्ट मत मांडले. (Amol Kolhe)
अजित पवार गटातील इच्छुक विलास लांडे हे मात्र नाराज असल्याची चर्चा आहे. याच प्रश्नावर डॉ. कोल्हे यांनी विलास लांडे हे नाराज होणे स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की 2019 ला ऐनवेळी माझ्यासाठी पक्षाने सांगितल्यानंतर माघार घेतली, माझ्यासाठी ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. विलास लांडे यांचा दांडगा जनसंपर्क असून सातत्यपूर्ण काम करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते.
हे ही वाचा :
अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश
मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर
तुम्ही तर पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं प्रकाश आंबेडकर यांचा संजय राऊतांवर घणाघात
शिवनेरीवर कोल्हे आणि आढळराव आमने – सामने, भेटीचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल !
मोठी बातमी : खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला मोठा धक्का, वंचितने जाहीर केले आपले उमेदवार