“भीक मागत केला केंद्र सरकारचा निषेध”
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवडच्या वतीने युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वात शनिवारी पिंपरी मार्केट शगुन चौक येथे केंद्र सरकारने वाढवलेल्या महागाईच्या व बेरोजगारीच्या विरोधात ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन शगुन चौकातून ते कपडा मार्केट मार्गे रिव्हररोड वरून शगुन चौकामध्ये येऊन थांबले. यावेळी युवकांनी आक्रोश करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणांबाजी केली. आमचे पीएम नरेंद्र बेरोजगारीचे केन्द्र, आमचे पीएम नरेंद्र महागाईचे केंद्र, गॅस झाले हजार, जागेवर या मोदी सरकार, पेट्रोल डिझेल झाले १०० पार जागेवर या मोदी सरकार, नोकरी द्या नाहीतर भीक द्या, महागाई कमी करा नाही तर भीक द्या, अशा घोषणा युवकांतर्फे यावेळी देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित गव्हाणे, नगरसेवक डब्बु आसवांनी, नगरसेवक निकिता कदम, नगरसेवक प्रसाद शेट्टी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत
अजित गव्हाणे म्हणाले “भाजप सरकारने एवढी महागाई वाढवली आहे सर्वसामान्य अडचणीत आहे गरीब जनतेला जगणे मुश्कील झालं आहे. कोरोना मध्ये नोकऱ्या गेल्या व्यवसाय अडचणीत आलेत हे अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार जनतेला दिलासा न देता जाती जातीच राजकारण करून लोकांचे लक्ष दुसरीकडे केंद्रित आहे. जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत केंद्र सरकार विरोधात याहुन तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेतली जातील असा इशारा अजित गव्हाणे यांनी दिला”.
यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले पेट्रोल-डिझेल चाळीस रुपये करू, दरवर्षी दोन कोटी रोजगार देवू असं म्हणत सत्तेत आले देणे तर सोडाच होत्या त्या नोकऱ्या सुद्धा गमावण्याची नामुष्की आज तरुणांवर आणि देशातील लोकांवर आली आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर गगनाला भिडले असून महागाईमुळे लोकांवर आज भिक मागायची वेळ आली आहे. म्हणून आम्ही ‘भीक मांगो’ आंदोलन केले. देशामध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई वाढली असून त्यांना काही विचारले असता ते फक्त मंदिर-मज्जिद भोंगा, औरंगजेब, अकबर, बाबर, अफजलखान हे मुद्दे पुढे आणतात. पण पेट्रोल डिझेल गॅस बेरोजगारी ही अफजल खान, बाबर, औरंगजेब, यांनी वाढवली नसून केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या धोरणामुळे वाढली आहे. आज पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ यासारख्या देशांमध्ये पेट्रोल डिझेल भारतापेक्षा निम्म्या किमतीत मिळतो तर भारतात का नाही? असा जाब नागरिकांनी केंद्र सरकारला विचारला पाहिजे असे आव्हान युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी यावेळी केले. आज भीक मागून मिळालेली रक्कम आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनिऑर्डर करणार आहोत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
यावेळी राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी आयुष निंबारकर, राहुल पवार, प्रवीण खरात, बापू पातळे, मजहर खान, अशोक भडकुंबे, अक्षय माचरे, अमोल रावळकर, शाहरुख शेख, लवकुश यादव, अमोल रावलकर, नितीन सूर्यवंशी, सागर वाघमारे, संतोष चव्हाण, प्रसादतरस, सरफराज खान, मयुर जाधव, अंकित गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादन – क्रांतिकुमार कडुलकर
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तब्बल 105 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !