Thursday, December 12, 2024
HomeNewsजुलै- 24: देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

जुलै- 24: देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

देश विदेश

१) अमेरिकेत सलग तिसऱ्या दिवशी ११०० पेक्षा जास्त कोरोनामुळे मृत्यू


वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिकेत एप्रिलनंतर प्रथमच कोरोनाबाधितांच्या मृत्यूत एवढी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे आता अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १४४२११ वरती गेली आहे.

२) अमेरिकेने रशियावर उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा आरोप केला


वॉशिग्टन, अमेरिका: रशियाने आरोपात तथ्य नसल्याचे सांगितले. रशियाचे रॉकेट त्यांचा देशी उपग्रहाचे उपग्रहाच्या जवळच्या अंतरावरून परिक्षण करत असल्याचा दावा रशियाने केला आहे.

३) अमेरिकेमध्ये ४० लाख पेक्षा जास्त व्यक्ती कोरोनाबाधित


वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिकेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाललेली आहे. अमेरिकेत पहिले १० लाख बाधित होण्यासाठी ९८ दिवसाचा कालावधी लागला होता. परंतु ३० लाख ते ४० लाख पूर्ण होण्यासाठी फक्त १६ दिवस लागले.

४) अमेरिकेबरोबरील द्विपक्षिय संबंध मोठ्याप्रमाणात बिघडणार: चीन


बीजिंग, चीन: अमेरिकेने हॉस्टन मधील पासपोर्ट कार्यालय बंद केल्यामुळे चीन त्याप्रमाणे अमेरिकेवरही कारवाई करणार आहे. त्यामुळे चीनने चेंगडू येथील पासपोर्ट कार्यालय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

५) भारत आणि श्रीलंकेने कर्जाच्या पुर्णबांधणिवर चर्चा केली


कोलंबो, श्रीलंका: श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या मागिल भेटीत त्यांनी भारताकडून कर्ज मंजूर करून घेतले होते, त्यावर चर्चा करण्यात आली तसेच खुली भांडवली गुंतवणुकीचा ही कोरोना प्रार्दुभावामुळे विचार केला जात आहे असे श्रीलंकेकडून सांगण्यात आले.

६) पाकिस्तानच्या संसदेसमोर विरोधी पक्षाने आंदोलन केले


इस्लामाबाद, पाकिस्तान: भारताच्या कुलभूषण जाधवांना तेथील लष्करी न्यायालयाने फाशी शिक्षा दिली होती. त्यामुळे भारताने जागतिक न्यायालयात दाद मागितली होती. जागतिक न्यायालयाने पाकिस्तान फटकारल्यानंतर पाकिस्तानमध्ये लष्करी न्यायालयाच्या निर्णया विरुद्ध इस्लामाबादच्या उच्च न्यायालयात दाद मागण्याचा नियम पाकिस्तान सरकारने केला. या नियमाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.

७) अफगाणिस्तान सरकारकडून झालेल्या हवाई हल्ल्यातील मृतांची संख्या ४५ वरती पोहोचली


हेरत, अफगाणिस्तान: अफगाणिस्तान सरकारकडून झालेल्या हवाई हल्ल्यानंतर मृतांची संख्या समोर येत आहे. त्यामध्ये तालिबानी नेता, त्याचा परिवार, काही सामान्य नागरिक आणि जे सरकारी अधिकारी तालिबान नेत्याला सरकारी आदेशावर सोडायला आले होते त्यांचा समावेश आहे.

८) अफगाणिस्तानमध्ये हिंदू, शिखांवर मोठ्याप्रमाणात हल्ले होत आहे, त्यांचे भारतात येण्यासाठी भारत स्वागत करेल: भारताचे परराष्ट्र मंत्रालय


दिल्ली, भारत: अफगाणिस्तानमध्ये आतंकवाद्यांकडून हिंदू आणि शिखांना त्रास दिला जात असल्याचे सांगत त्यांचे भारतात येण्यासाठी भारत स्वागत करेल असेही त्यांकडून सांगण्यात आले.

९) आर्थिक परिस्थिती चांगली, गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीत जास्त प्रतिकुलता करण्याची गरज नाही: रिझर्व बॅकेचे गव्हर्नर शशिकांत दास 


मुंबई, भारत: रिझर्व बॅकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी प्रथम बॅकेची व्यवस्था चांगली राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतू  रिझर्व बॅकेच्या FSR च्या अहवालानुसार १२.५% NPA वर जाण्याच्या शक्यतेबाबत कोणतीही स्पष्टोक्ती त्यांकडुन करण्यात आली नाही.

१०) कुणाला मुलगी आहे म्हणुन तो महिलांवर अन्याय करणार नाही असे सांगता येऊ शकत नाही: अमेरिकेच्या सिनेटर अलेझांड्रिया ओकेसिओ- कोर्टेझ


वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिकेच्या संसदेत रिपब्लिक पक्षाच्या सिनेटरने महिलांवर अक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून बोलताना त्या म्हणाला. त्याबरोबर अजून ही काही महिला सिनेटरांनी त्याचे जीवनातील आलेल्या अनूभव व्यक्त केली.

संबंधित लेख

लोकप्रिय