देश विदेश
१) भारतीय सैन्याचे कमांडर आणि चीनी सैन्याचे कमांडरमध्ये १५ तास मिटिंग चालली
नवी दिल्ली, भारत: भारतीय आणि चीनी सैन्य आपापल्या बाजूने वाद झालेल्या जागेपासून मागे गेल्यानंतर सैन्याच्या कंपनी प्रमुखांमध्ये आता वाटाघाटीची चर्चा झाली. यामध्ये दुसऱ्या पातळीवरती सैन्यमागे घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल आणि चीनने सीमेवरती तैनात केलेले जास्तीचे सैन्य, दारु गोळा, हवाई सुरक्षेतची साधने, तोफा भारत चीनने सीमेवरती शांतता राहावी म्हणून सही केलेल्या कराराच्या विरूद्ध म्हणून मागे घ्यावा लागतील असेही भारतीय सैन्यकडून सांगितले जात आहे.
२)अखेर अमेरिकेच्या सरकारने परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसावरून नियम मागे घेतला
वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिकेच्या नवीन शिक्षण धोरणाला शिक्षक, शैक्षणिक संस्था, विरोधी पक्ष, काही राज्यातील सरकारे, उद्योग व्यवसायदारांकडून झालेला कडवा विरोध पाहता अमेरिकेच्या सरकारला हा नियम रद्द करवा लागला. त्यामुळे सुमारे १० लाख परदेशी विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
३) चीनने भारताबरोबरच्या सीमेवर केलेल्या दबावाचे राजकारण तसेच हॉगकॉगवरती लादलेले नियम यावरून चीनचा कम्युनिष्ट पक्ष यादिवसात कसा विचार करत आहे हे आपल्याला दिसून येत आहे: अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
वॉशिग्टन, अमेरिका: भारत हा अमेरिकाचा चांगला मित्र आहे. तसेच चीनच्या कम्युनिष्ट पक्षाने काही काळापासून घेतलेल्या निर्णायामूळे ते कसा विचार करत आहेत हे आता समोर येत आहे.
४)इराणने भारताला चाबाहर बंदर प्रकल्पापासून अलग केले: इराण
दिल्ली, भारत: इराणबरोबर चाबाहार बंदराबाबत भारत सरकारने केलेला करार इराणने भारताकडून कोणताही सक्रिय सहभाग न पाहता रद्द केला. भविष्यात भारतला इराणबरोबर जर नवीन कोणता प्रकल्प करायचा असेल तर तिसऱ्या देशाच्या सुटी आधी घ्यावा लागतील असेही इराण सरकारकडून सांगण्यात आले.
५)अमेरिकेने हॉगकॉगला दिलेले प्राधान्य काढून घेतले त्यामुळे चीनही अमेरिकेला प्राधान्यचे देण्याचे नियमही रद्द करणार: चीनी सरकारचा प्रवक्ता
बीजिंग, चीन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हॉगकॉगचे व्यापारी प्राधान्याला काढून घेतल्यानंतर चीनही अमेरिकेबरोबर तसेच करणार असल्याचे चीन सरकारच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. तज्ञांकडून यागोष्टीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
६) अमेरिकेमध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाचे दावेदार जोइ बिदेन यांनी २ ट्रिलियन डॉलरचा हवामान बदल थांबवण्याचा प्लान सादर केला
वॉशिग्टन, अमेरिका: अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीचे वारे वाहत असताना पदाचे दावेदार जोइ बिदेन यांनी २ ट्रिलियन डॉलरचा प्लान सादर केला तसेच ते निवडणूक जिंकले तर ते पॅरिस करारात पुन्हा सामिल होणार असल्याचे सांगितले. तसे अमेरिका हरितवायू उत्सर्जनात जगात २ नंबरचा देश असल्याचे सांगितले.
७)बांग्लादेशात आलेला पूर पाहता १० लाखपेक्षा जास्त लोकांनी स्वत:ची घरे सोडली
ढाका, बांग्लादेश: बांग्लादेशात पाऊसामूळे मोठाप्रमाणात पूर आला आहे. त्यामूळे १० लाखपेक्षा जास्त लोकांनी स्वत:च्या पशूसंहित घरे सोडली.
८)अमेरिकेच्या सरकारने त्यांनी तयार केलेली कोरोनावरील लस चांगला निकाल दाखवत असलेल्याचे सांगितले
शिकागो, अमेरिका: अमेरिकेच्या सरकारने त्यांनी कोरोनावर तयार केलीली लस चांगला निकाल देत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी रशिया आणि चीनने असा दावा केला होता.
९) युरोपिय संघ आणि भारताने मुक्त व्यापार धोरणावर चर्चा चालू केली.
नवी दिल्ली, भारत: भारताने आणि युरोपिय संघाने मुक्त व्यापार करारावरती चर्चा चालू केली. ७ वर्षाच्या चर्चेनंतर कोणताही निर्णय होत नसल्यामुळे मोठ्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा होणार आहे.
१०)चीनने इराणमध्ये रोड बांधण्याच्या करारावर सह्या केल्या
तेहरान, इराण: चीनने इराणमध्ये रोड बांधण्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. चीनने यासाठी अमेरिकेकडून आर्थिक सुट पण मिळवली आहे.