देश विदेश
१) गुगल भारतामध्ये Digital अर्थव्यवस्था व्हावी म्हणून ७५००० कोटीचा निधी तयार करणार
दिल्ली, भारत: भारतामध्ये डिजीटल अर्थव्यवस्था तयार व्हावी म्हणुन गुगलने ७५००० कोटीचा निधी निर्माण करणार असून तो पुढील ५ ते ७ वर्षात खर्च करण्यात येणार आहे.
२) सिंगापूरने १० भारतीयांना परत भारतात पाठवले आणि त्यांना परत सिंगापूरमध्ये येण्यावर बंदी घातली
सिंगापूर: सिंगापूरने १० भारतीयांना सर्किट ब्रेकींगचे कारण देत त्यांना बळजबरी भारतात पाठवले आणि पुन्हा सिंगापूरमध्ये प्रवेश करण्यावर त्यांवर बंदी घातली. कोरोना प्रार्दुभावामुळे सिंगापूरमध्ये शहर बंदीचा आदेश असताना ते भाड्याच्या हॉटेलमध्ये समारंभ करत होते.
३) पाकिस्तानने वाघासिमेवरून भारतने अफगानिस्तानबरोबर व्यापार करण्यास संमती दिली
इस्लामाबाद, पाकिस्तान: पाकिस्ताने कोरोना प्रार्दुभाव पाहता भारताची वाघा सीमा बंद केली होती ती पुन्हा उघडणार असून त्यातून भारताला अफगाणिस्तान बरोबर व्यापार करता येणार आहे. याबाबत अफगाणिस्तानने पाकिस्तानला विनंती केली होती.
४) जम्मुमध्ये कोणत्याही प्रकारचे गोळीबार बंदीच्या उल्लंघन भारत खपवून घेणार नाही: सैन्यदल प्रमुख मनोज ननावरे
नवी दिल्ली, भारत: जम्मुमध्ये कोणत्या शस्त्रसंधीचे उल्लंघन भारत सहन करून घेणार असे त्यांनी जम्मुमध्ये सैन्याच्या तुकडीला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले.
५) चीनचे लस बनवणारी कंपनी कॅनसिनो बायोलॉजिक्स मोठ्याप्रमाणात कोरोनावरील लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करू पाहात आहे
बीजिंग, चीन: चीनची कॅनसिवा बायोलॉजिक्स कोरोनाच्या लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे जगातिक पातळीवर परिक्षण करु इश्चित आहे. त्यासाठी ते ब्राझील, चिली, सौदी अरेबिया आणि रशिया देशांबरोबर चर्चा करत आहे.
६) दक्षिण आफ्रिकाने दारू विक्रीवर पुन्हा बंदी घातली
जॉहन्सबर्ग, दक्षिण आफ्रिका: दारू खरेदी करताना कोणत्याची प्रकारचे नियमन पाळले जात आणि त्यामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे, असे सांगत दक्षिण आफ्रिकेने देशात पुन्हा दारु विक्रिस बंदी घातली.
७) जनतेने दुकानात जाताना मास्क घातलेच पाहिजे: ब्रिटनेचे पंतप्रधान जॉनसन
लंडन, ब्रिटन: कोरोनाचा प्रार्दुभाव शहर बंदी उठल्यानंतर वाढू नये म्हणून दुकानात आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क घातलेच पाहिजे असे सांगितले.
८) इराणने युक्रेनचे विमान रडारमधील खराबीमुळे पाडण्यात आले होते असे सांगितले
तेहरान, इराण: जानेवारी इराणकडून युक्रेनचे विमान रडारमधील खराबीमुळे पाडण्यात आले. त्यावर इराण सरकारकडून संसदीय समिती नेमण्यात आली होती. त्यांच्या पडताळणीतून हा प्रकार उघड झाला.
९) श्रीलंकेतील प्रचाराच्या सर्व सभा कोरोनाचा होणारा प्रार्दुभाव पाहून रद्द केल्या
कोलंबो, श्रीलंका: निवडणूकीचे वारे श्रीलंकेत वाहत असतात सत्ताधारी पक्षाने त्याच्या सर्व प्रचारसभा आणि जनयात्रा रद्द केल्या आहेत. कोरोना प्रार्दुभाव सभेमुळे वाढू नये असे सरकारकडून सांगण्यात आले.
१०) आजच ६३१ लोकांच्या मृत्युसह ब्राझीलमध्ये कोरोनाचा मोठा प्रार्दुभाव होत आहे
रिओ, ब्राझील: कोरोना बाधितांच्या संख्येत जगात दुसऱ्या असणाऱ्या ब्राझीलमध्ये आता बाधितांची संख्या १८,६४,६८१ झाली. त्यामध्ये ७२,१०० लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.