देश विदेश
१) भारताने खरेदी केलेल्या राफेल विमानाने फ्रान्समधून भारताच्या दिशेने उड्डान केले
नवी दिल्ली, भारत: भारताने खरेदी केलेल्या राफेल विमानांपैकी ५ राफेल विमानांनी भारताच्या दिशेने आज उड्डान केले. ५ विमानांमध्ये ३ एक वैमानिक उडवू शकले आणि २ विमाने दोन वैमानिक उडवू शकतील अशी क्षमता आहे. २९ तारखेला ते भारतात पोहोचतील असे भारताच्या विमान दलाकडून सांगण्यात आले.
२) ऑस्ट्रेलियाच्या ग्राहक मंचाने गुगल वरती वैयक्तिक गुप्ततेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला
कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियाच्या ग्राहक मंचाने त्यांचा कोर्टात गुगल ऑस्ट्रेलियामधील नागरिकांना खोटी आश्वासने देऊन भूरळ घालत आहे आणि माहितीची गुप्तता ठेवत नसल्याचा आरोप केला.
३) इस्त्राईलमधील तरूण पिढी राष्ट्राच्या समस्येला घेऊन रस्त्यावर
जेरूसलेम, इस्त्राईल: कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि सत्ताधारी पक्षावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ढासलेला विश्वास या गोष्टीचा विचार करून इस्त्राईलमधी तरूण पिढी मोठ्याप्रमाणात आंदोलनात उतरली.
४) भारताने अजून ४७ ॲपलिकेशन बंद केली
दिल्ली, भारत: भारताने बंद केलेल्या ५९ चीन ॲप नंतर त्यांच्याशी मिळतीजूळती अजून ४७ ॲपलिकेशन बंद केली. त्यामध्ये टिकटॉक लाईट, हॅलो लाईट आणि शेरईट लाईटचा समावेश आहे.
५) हॉगकॉगने त्यांच्या शहरात नवीन कायदा लागू केला, त्यामुळे मास्क न लावल्यास कारवाई
हॉगकॉग, चीन: हॉगकॉगने कोरोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था ठिक करण्यासाठी हॉटेल उद्योगांसाठी नवीन नियम लागू केला. त्यानुसार मास्क घालणे सक्तिचे केले आहे तसेच पालन न करणाऱ्या हॉटेलवर बंदी पण घातली जाईल अशी चेतावणी पण देण्यात आली आहे.
६) इराण अमेरिकेबरोबरील वाढलेले तणाव पाहता युद्धनौकेला समुद्रात उतरवून सराव करणार
तेहरान, इराण: इराणने अमेरिकेबरोबरील बिघडलेले तणाव पाहता युद्ध सराव करण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी त्यांची निमिझ वर्गातील युद्धनौकेची प्रतिरूपी समुद्रात उतरवली.
७) मक्केत हजला जाण्यासाठी कोरोना प्रार्दुभावामुळे कमी प्रमाणात भाविक दाखल
दुबई, सौदी अरेबिया: दरवर्षी हजला जाण्यासाठी मोठ्याप्रमाणात भाविक येतात त्यांची अंदाजे संख्या २५ लाख पेक्षा जास्त आहे. परंतु, यावर्षी सौदी अरेबिया सरकारने फक्त १०००० लोकांनाच हजला जाण्याची संमती देण्याचे जाहिर केले आहे.
८) व्हिएतनाम सरकार दानांग शहरातून ८०००० नागरिकांना कोरोनाचा प्रार्दुभाव थांबवण्यासाठी तात्पुर्ते स्थलांतर करणार
हानोई, व्हिएतनाम: व्हिएतनाम सरकारने शनिवारी स्थानिक लोकांमध्ये एका नागरिका कोरोना झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी आज शहर खाली करण्याचा निर्णय घेतला. तसेच त्याव्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना विलगिकृत केले गेले आहे. ८०००० व्यक्तिंना स्थलांतरित करण्यासाठी ४ दिवस लागतील असेही सरकारकडून सांगण्यात आले.
९) गेल्या सहा महिन्यात ब्राझीलच्या जंगलांना लागण्याऱ्या आगी दुप्पट झाल्या आहेत
ब्रासिलिआ, ब्राझील: गेल्या सहा महिन्यात जंगलात लागलेल्या आगी दुप्पट झाल्याचा तेथील संशोधक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी ब्राझीलचा विकास होण्यासाठी जंगलाच्या जमिनी मोकळ्या केल्या पाहिजेत असे वक्तव्य केल्यानंतर हा प्रकार वाढल्याचे या संस्थेकडून सांगण्यात आले.
१०) सुदानच्या दर्फुर भागात झालेल्या हिंसाचारात ६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला: जागतिक संघ
खार्तौम, सुदान: सुदानमधील दर्फुर प्रांतात झालेल्या हिंसाचारामूळे ६० पेक्षा जास्त व्यक्ती मृत्यूमुखी पडले असून ६० लोक जखमी झाले आहे असे जागतिक संघाकडून सांगण्यात आले.