Thursday, December 12, 2024
HomeNewsजुलै- 17: देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

जुलै- 17: देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

देश विदेश

१)काही ठिकाणी चीनी सैन्याची माघार अपेक्षेप्रमाणे झालेली नाही: भारत सरकार


दिल्ली, भारत: नुकत्याच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहच्या लेहमधील भेटीनंतर चीनचे सैन्य अपेक्षेप्रमाणे मागे गेलेले नसल्याचे समोर आले. थोड्याच दिवसांपूर्वी सैन्याच्या प्रमुखांमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या चर्चा झाल्या होत्या.

२) भारत बायोटेकने मानवावर कोरोनावरच्या लसीचे परिक्षण करायला सुरुवात केली


दिल्ली, भारत: जगात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना त्यावरील लस शोधण्याला गती मिळायला सुरू झाले आहे. जगाबरोबर भारताने ही लस तयार केली असून तीचे माणसांवरती परिक्षण भारतातील वैज्ञानिकांनी सुरू केले. 

३)पाकिस्तान भारताला कुलभूषण जाधवांबरोबर बोलण्याची तिसरी संधी द्यायला तयार: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महंमद कुरेशी


इस्लामाबाद, पाकिस्तान: भारताला दुसऱ्यांदा कुलभूषण जाधवांबरोबर बोलण्याची संधी दिल्यावर भारताकडून त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे सांगण्यात आल्यावर पाकिस्तान सरकारने तिसऱ्यांदा बोलण्याची संधी देण्याची तयारी दर्शवली. 

४)ब्राझीलने २० लाख कोरोनाबाधितांचा टप्पा पार केला


रिओ, ब्राझील: जगात दुसऱ्यानंबरला कोरोना बाधितांची संख्या असलेल्या ब्राझीलने २० लाख कोरोना बाधितांची संख्या पार केली. त्याच बरोबर तेथे ७६००० पेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

५)चीनकडून हल्ला होण्याची शक्यता ग्राह्य धरून तैवानने सैन्याचा सराव घेतला


ऐचुंग, तैवान: चीनबरोबर विकोपाला गेलेले वाद लक्षात घेता तसेच चीनकडून भारतील सीमेवरती झालेले आक्रमण लक्षात घेता तैवानने सैन्याचा मोठा सराव घेतला. हा सराव घेताना एक हॅलिकॉप्टर पडले त्यामध्ये वैमानिक आणि सहाय्यक वैमानिकाचा मृत्यू झाला.

६) इराणकडून चाबाहार बंदरावरील रेल्वे प्रकल्पाबाबत कोणतीही माहिती भारताला देण्यात आले: भारताचे परराष्ट्र विभाग


दिल्ली ,भारत: चाबाहार बंदर प्रकल्पातून इराणने भारताला बाहेर केल्यानंतर भारताने इराणने डिसेंबरपासून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही असे परराष्ट्र    विभागाकडून सांगण्यात आले.

७)ब्रिटनने आरोग्याखात्यावरील खर्च वाढवला, हिवळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले


लंडन, ब्रिटन: ब्रिटनने आरोग्यखात्यावर खर्च केला जाणारा निधी वाढवला असून प्रत्येक प्रभागवारी खर्च केला जाणार असल्याचे सांगितले. हिवाळ्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ही तयारी केल्याची ब्रिटन सरकारने सांगितले.

८)इस्त्राईलने आठवड्याच्या शेवटी असणाऱ्या सुट्टीच्या वेळेस शहरबंदी लागू केली


जेरुसेलम, इस्त्राईल: इस्त्राईलने कोरोनाचा होणारा प्रार्दुभाव लक्षात घेता आठवड्याच्या सुट्टीच्या वेळेस त्यांच्या देशात शहरबंदीचे आदेश लागू केले. 

९)चीन अमेरिका पर्याय बनन्याचा प्रयत्न करत नाही, कोणाला बळाच त्रास देत नाही: चीनी सरकार


बीजिंग, चीन: चीनने अमेरिकाला दिलेले आव्हाहन पाहात तो अमेरिकेला पर्याय आहे का ? अशा प्रश्न जगभर विचारत जात असताना चीन कोणाला बळाच त्रास देत नाही आणि आम्हाला अमेरिकेला पर्याय बनायचे नाही असे सांगितले.

१०)नेपाळचे पंतप्रधान ओलींनी रामजन्मभूमी शोधायला तेथील पुरातत्व विभागाला आदेश दिले


काठमांडू, नेपाळ: नेपाळने रामजन्मभूमी नेपाळमध्ये असल्याचा दावा केल्यानंतर ती शोधण्याचे आदेश तेथील पंतप्रधानांनी पुरातन विभागाला दिले.

संबंधित लेख

लोकप्रिय