Thursday, September 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबिरसा फायटर्सची नाशिक विभागीय सभा संपन्न

बिरसा फायटर्सची नाशिक विभागीय सभा संपन्न

तळोदा : आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदिवासींचे कुलदैवत याहा मोगी माता, धरतीआबा बिरसा मुंडा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना सुशीलकुमार पावरा म्हणाले की, आपल्या संघटनेच्या नावातच फ़ायटर्स म्हणजे लढणे आहे. आदिवासीच्या वाढत्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्यक्ष काम करावे. सामाजिक जनजागृती करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहा असे आवाहन केले.

माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी बिरसा फायटर्स संघटनेला शुभेच्छा देऊन पर्यावरण संरक्षण, झाडे लावणे, माती संधारण यावर मार्गदर्शन करून संघटनेने यावर ही काम करण्याचे आवाहन केले. मनोज पावरा राज्याध्यक्ष यांनी पेसा कायदा, शैक्षणिक समस्या, पाणी समस्या, संघटन वाढविणे यावर मार्गदर्शन केले. 

यावेळी विभागीय अध्यक्ष विलास पावरा, मांगीलाल वळवी, दयानंद चव्हाण, विजय ठाकरे, भरत पावरा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चर्चासत्रात डीबीटी, आश्रम शाळेतील शिक्षण, समस्या, विविध सरकारी योजना, वनपट्टा, बोगस आदिवासी, ग्रामीण भागातील वीज, पाणी, रस्ते, आरोग्य यावर चर्चा करून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. यावेळी धुळ्याचे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, बागलाण तालुकाध्यक्ष विजय सहारे (नाशिक), नवापूरचे तालुकाध्यक्ष राकेश वळवी, पंढरपूरचे सुनील पावरा, कार्याध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, विभागीय संघटक जगदीश वळवी, रेवानगर सरपंच हिरालाल पावरा मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र पाडवी यांनी प्रस्तावना तर मोहन वळवी,अमरसिंग ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय