Nanded : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटूची तीन तास निदर्शने व घेराव करत विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अनेक कामगार वर्ग नगर परिषद व पंचायत मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करूनही जॉब कार्ड देण्यास प्रशासनाच्या वतीने टाळाटाळ करण्यात येत असून जिल्ह्यातील हजारो कामगार महिला – पुरुष हे कामापासुन वंचित आहेत.
तेव्हा तातडीने जॉब कार्ड देऊन काम द्या आणि केरळ च्या धर्तीवर रु. ६०० रुपये रोजाप्रमाणे वेतन द्या, नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, हदगाव, धर्माबाद, बिलोली, मुखेड,किनवट, माहूर व इतर ठिकाणी जॉब कार्ड करिता मागणी नोंदविणे व कार्ड वाटप मोहीम सुरू करा. ज्या कामगारांनी मागणी केलेली आहे अशांना तातडीने जॉबकार्ड देने अन्यथा बेरोजगार भत्ता द्या, नांदेड जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजने अंतर्गत कामे काढा, जेणेकरून कामगार स्थलांतरीत होण्यास आळा बसेल, गरीब, अल्पभूधारक, मजूर, निराधार, दिव्यांग व इतर कुटुंबांचा दारिद्र्य रेषेचा सर्वे करून त्यांना पिवळे रेशन कार्ड द्यावे, बेघर जनतेस घरकुलाचे वाटप करावे, ज्यांना जागा नाही त्यांना जागा देऊन घरकुलाचा लाभ द्यावा, गायरान व इतर जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून त्यांना मालकी हक्क द्यावा, कंत्राटी कामगारांचे वेतन बँक खाते ( डीबीटी) द्वारे देण्यात यावे. जे देणार नाहीत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करावेत,वृद्ध तसेच निराधार यांच्या पेमेंट मध्ये वाढ करण्यात यावी. या व इतर मागण्याकरिता दि.१४ मार्च रोजी दुपारी १२ ते ४ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करून घेराव आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला पुरुष सामील झाले होते.या आंदोलनाचे नेतृत्व कामगार व जनवादी चळवळीचे नेते कॉ.विजय गाभणे, सिटूच्या राज्यसचिव व जिल्हाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार, सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड यांनी केले.
सदरील मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास निदर्शने करून जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालण्यात आला. नगर परिषद प्रशासन विभागाचे जिल्हा सह आयुक्त यांना घेराव घालण्यात येणार होता. परंतु निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे घेराव घालण्याचे रद्द करण्यात आले.
सदरील आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.दिगांबर काळे, कॉ.दिलीप पोतरे, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ.जय गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ.मंगेश वटेवाड, कॉ. संतोष शिंदे आदींनी प्रयत्न केले, अशी माहिती सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.


हे ही वाचा
मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट
ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की
खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक
ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय
ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश
मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय