मुंबई / वर्षा चव्हाण – महाराष्ट्र आता कायमचा दुष्काळ मुक्त होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासाठी चार प्रकल्पांना नुकतीच मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली. (Mumbai)
नव्या सरकारसाठी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी टॅगलाईन आता भाजपनं दिली आहे. पण तो पुढे कुठल्या दिशेनं जाणार आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मी आधी मुख्यमंत्री असताना ज्या प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली होती ते प्रकल्प सुरु केले,काहींना गती दिली. काही प्रकल्प पूर्ण झाले, काहीचं लोकार्पण झालं अनेक नवीन योजना आपण सुरु केल्या. (Mumbai)
येत्या काळात गोष्टी तर अनेक करायच्या आहेत, पण नदीजोड प्रकल्पांवर भर असणार आहे. कारण मी आत्ता इरिगेशन मिनिस्टर म्हणून चार नदीजोड प्रकल्पांना मान्यता दिली आहे.
हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त करु शकतात, कायम! त्यामुळं या नदीजोड प्रकल्पांवर माझा भर राहणार आहे. तसंच ग्रीन एनर्जीवर माझा भर राहणार आहे. असे फडणवीस यांनी सांगितले.
मराठवाडा आणि दुष्काळ नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु फडणवीस यांच्या घोषणेने आता मराठवाडा दुष्काळाच्या जोखडातून मुक्त होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळवणे हा त्यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी त्यांनी ६४ कोटींचा निधी आधीच मंजूर केला आहे.
काल शपथ घेतल्या घेतल्या त्यांनी नदी जोड प्रकल्पाबाबत आपला इरादा बोलून दाखवला. नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी भाग्यविधाता प्रकल्प असणार आहे. (Mumbai)
हे ही वाचा :
Jio च्या ग्राहकांसाठी खूशखबर : 479 रुपयांत 84 दिवसांचा नवा प्लॅन ; वाचा काय आहे ऑफर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय
95 विधानसभा मतदारसंघात EVM-VVPAT मशिन्सच्या तपासणीसाठी 104 अर्ज प्राप्त
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
नेक्स्ट जेनरेशन बजाज चेतक या महिन्यात लाँच होणार, वाचा काय असणार किंमत
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती