Home राज्य Mumbai : आता मुंबईत घ्या हक्काचं घर, म्हाडा बांधणार 2500 परवडणारी घरे,...

Mumbai : आता मुंबईत घ्या हक्काचं घर, म्हाडा बांधणार 2500 परवडणारी घरे, कधी निघणार लॉटरी?

Mumbai

मुंबई (वर्षा चव्हाण) – मुंबईत स्वत:चे घरे घेण्याचे अनेकांचे स्वप्न असून या प्रयत्नात म्हाडाची मोठी मदत होते. म्हाडाने आतापर्यंत मुंबई शहर आणि उपनगरात म्हाडाच्या वसाहती आणि सदनिका बांधून शहरातील नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. आता पुन्हा म्हाडाने मुंबईत जवळपास 2500 घरे बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. (Mumbai)

म्हाडातर्फे मुंबईतील गोरेगाव परिसरात 2 हजार 398 घरे बांधण्यात येणार आहेत. 2027 पर्यंत हे उद्दिष्ट गाठले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी तीन विकासकांना काम देण्यात आले आहे. म्हाडातर्फे बांधण्यात येणारी ही घरे लॉटरीद्वारे विकली जाणार आहेत. त्यामुळे मुंबईत घर घेण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या प्रत्येक नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

मुंबईतील गोरेगाव येथे बांधण्यात येणाऱ्या एकूण घरांची संख्या लक्षात घेता हा म्हाडासाठी मोठा प्रकल्प असेल. या प्रकल्पांतर्गत एकाच ठिकाणी अधिक घरे बांधली जाणार आहेत.

मुंबईजवळील परवडणाऱ्या घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी म्हाडाने अनेक ठिकाणी माहिती केंद्रे उभारली आहेत. परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प मुंबईजवळ विरार, ठाणे आणि कल्याण सारख्या भागात आहेत. (Mumbai)

पत्राचाळ भूखंडावर तयार होणाऱ्या या घरांची विक्री सोडतीच्या माध्यमातून केली जाणार असून, त्यामुळं मुंबईच्या परिघामध्ये स्वत:च्या घरांसाठी प्रयत्नांत असणाऱ्याना या योजनेचा लाभ घेणार आहे.

इथे तयार होणाऱ्या घरांची एकूण संख्या पाहता एकाच ठिकाणी अधिकाधिक घरं असणारा हा म्हाडाचा एक मोठा प्रकल्प ठरणार आहे.
2027 मध्ये या प्रकल्पातील घरांसाठीची सोडत निघणार असून, यामध्ये अल्प गटासाठी 1023, मध्यम गटासाठी 1242 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 133 घरं उपलब्ध असतील.

गोरेगाव पत्राचाळ इथं पाच भूखंड असून त्यामधील आर-1, आर-7, आर-4 आणि आर-13 या भूखंडांवरील घरांच्या निर्मितीसाठी विकासकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

हे ही वाचा :

पुणे महानगरपालिके अंतर्गत 179 पदांसाठी भरती ; विनापरीक्षा भरती

लाडकी बहिण योजनेच्या संदर्भात एकनाथ शिंदे विधानपरिषदेत काय म्हणाले वाचा !

‘मराठी माणसं भिकारी आहेत’ म्हणत कल्याणमध्ये मराठी माणसावर हल्ला

बसमध्ये छेडछाड करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीस रणरागिणीने दिला चोप

IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची अजित पवारांची केंद्राकडे मागणी

सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती

जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

Exit mobile version