Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मराठा सेवा संघाच्या वतीने एम.पी.एस.सी. उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.२२ – मराठा सेवा संघाच्या वतीने आकुर्डी येथील जिजाऊ सभागृहात एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या शालन घाटुळ व अश्विनी पाटील यांनी जिजाऊ वंदना सादर केली.

यावेळी एम.पी.एस.सी. परीक्षेत यश प्राप्त केलेल्या कु.राजकिरण डोके (पोलिस उपनिरीक्षक), श्रृती मालपोटे (पोलिस उपनिरीक्षक), माधुरी किरवे (पोलिस उपनिरीक्षक),अजिंक्य बवले (कामगार अधिकारी क्लास २), तसेच उत्कृष्ठ क्रीडा खेळाडू आदित्य शिंदे (व्यवसायिक कबड्डी) यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कार करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, मराठा सेवा संघ पुणे जिल्हा माजी अध्यक्ष राजेंद्र कुंजीर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश संपर्क प्रमुख अनिल ताडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे, कल्पना गिड्डे, गणेश दहिभाते, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतिश काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे म्हणाले की, मराठा सेवा संघ नेहमीच गुणवंत होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहतो. भावी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार कार्यक्रम आयोजित करतो. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार यांनी अत्यंत प्रतिकुल प्ररिस्थितीत यश संपादन केल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा माजी अध्यक्ष राजेंद्र कुंजीर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण गुणवंतांना तुम्ही जरी यश प्राप्त केले असले तरी आपल्या समाजातील गोरगरीब वंचित मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करा. ‘पे बॅक टू सोसायटी’ या तत्वाप्रमाणे वागून इतर तरुण तरुणींना सर्वप्रकारची मदत करावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव म्हणाले की,कोणत्याही अमिषाला, दबावाला बळी न पडता सर्व नवनियुक्त अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रशासकीय सेवेत सर्वसामान्यांना, अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा असे अवाहन केले. सध्या मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात आहे. महिलांवर, मुलींवर अत्याचार होत आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे प्रस्तापितांकडून शोषण केले जात आहेत.यापासून समाजाला वाचविण्यासाठी संविधानाच्या मार्गाने कायद्याप्रमाणे चांगले काम करा. जेणे करून पुढच्या अनेक पिढ्यांनी तुमच्या प्रशासकीय सेवेतील कार्याचा आदर्श घेऊन वाटचाल केली पाहिजे.असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोरेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक गणेश दहिभाते यांनी केले, तर जिजाऊ ब्रिगेडच्या पुणे जिल्हाध्यक्षा सुनिता शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे, हेमा ग्यानी, प्रकाश बाबर, शितल घरत, अशोक सातपुते, वैभव जाधव, सुभाष देसाई, सुरेश इंगळे, मंगेश चव्हाण, लहू अनारसे, शरद मालपोटे, अश्विनी पाटील, किरण खोत, शालन घाटुळ, वाल्मिक माने, संपतराव जगताप यांनी विशेष सहकार्य केले.

---Advertisement---


हे ही वाचा :

---Advertisement---

भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार माहिती आहेत का? तर ‘हे’ आमदार सर्वात गरीब…यादी पहा !

पश्चिम बंगाल मध्ये मणिपूरची पुनरावृत्ती; महिला उमेदवाराची विवस्त्र धिंड

ब्रेकिंग : ‘या’ 4 जिल्ह्यांना आज ‘रेड ॲलर्ट’ ; तर “या” जिल्ह्यांना ‘ऑरेंज ॲलर्ट’

डॉ. आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायांचा ‘लॉग मार्च’

हातभट्टीमुक्त गाव संकल्पना राज्यात राबविण्याचा सरकारचा विचार

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

सहायक सरकारी अभियोक्ता गट-अ पदभरतीसाठी तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles