Wednesday, December 18, 2024
Homeजुन्नरJunnar : राष्ट्रीय लोकन्यायालयात ४ हजार पेक्षा जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली

Junnar : राष्ट्रीय लोकन्यायालयात ४ हजार पेक्षा जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली

जुन्नर (आनंद कांबळे) : दिवाणी व फौजदारी प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी तालुका विधी सेवा समिती, जुन्नर व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर न्यायालयात शनिवार (दि. १४) रोजी चौथ्या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकन्यायालयात ४ हजार पेक्षा जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली (Junnar)

यावेळी ४ हजार ४२२ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात येऊन तडजोडीने एकूण रक्कम ३ कोटी ४० लाख ७८ हजार ८१२ रूपये वसुल झाले. राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन जेष्ठ पक्षकार अशोक सूर्यवंशी यांच्या हस्ते व ‘नालसा’ थीम गाणे लावून करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती जुन्नरच्या अध्यक्षा व दिवाणी न्यायाधीश श्रीमती नम्रता बिरादार व वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड हेमंत भास्कर यांनी उपस्थित वकील व पक्षकार यांना जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्याचे आवाहन केले.

राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालय, जुन्नर या न्यायालयातील दिवाणी व फौजदारी एकूण ८७ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाले असुन १८ लाख ९७ हजार ३१ रक्कम रूपये वसूल झाले तसेच दाखलपूर्व  ४ हजार ३३५ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाले असुन ३ कोटी २१ लाख ८१ हजार ७८१ रूपये रक्कम वसुल झाले. असे एकूण ४ हजार ४२२ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असुन तडजोडीने एकूण ३ कोटी ४० लाख ७८ हजार ८१२ रूपये वसुल झाले. (Junnar)

यावेळी सह. दिवाणी न्यायाधीश स्वप्ना घुले व वकील बार असोसिएशनचे सचिव ॲड आशिष वानखेडे, सहा.गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर, ओतुरचे पोलीस निरीक्षक लहू थाटे, जुन्नर चे पोलीस निरीक्षक किरण अवचर, वकील, पक्षकार आदी उपस्थित होते. 

दि.२८ सप्टेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढल्याबद्दल ॲड महावीर चोरडीया व ॲड सचिन चव्हाण यांचा प्रशस्तीपत्र व रोपटे देउन सत्कार करण्यात आला. (Junnar)

सदर राष्ट्रीय लोकन्यायालय यशस्वी होणे करिता पॅनल ॲडव्होकेट म्हणून ॲड लक्ष्मी घुटे व ॲड अजिंक्य रासने यांनी कामकाज पाहिले. न्यायालयीन कर्मचारी सहायक अधिक्षक के. डी. मोकाशी, लघुलेखक  ए. के. मते, व श्रीमती. एस. बी. तुपलोंढे, व वरीष्ठ लिपीक पी. सी. सुरदूसे, आर. आर. रावणवेणी, एस. पी. बेरड, एस. एल. वंजारे, सी. एस. जोशी, एन. एस. नरोटे, एम. डी. जाधव, एस. बी. कापडणे, तसेच शिपाई एन. सी. गोंगे, एस. पी. कुडळ, सी. एस. भालेकर या कर्मचारी यांनी सदर लोकन्यायालयात न्यायालयीन कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड आशिष वानखेडे यांनी केले.

(Junnar)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी

धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप

परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ

ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय