Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याRahul Gandhi : आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना देण्यासाठी मोदी सरकारने वनजमीन कायदा कमकुवत केला...

Rahul Gandhi : आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना देण्यासाठी मोदी सरकारने वनजमीन कायदा कमकुवत केला – राहुल गांधी

२२ उद्योगपतींची ६५ हजार कोटीची कर्जे माफ का केली

नंदुरबार : खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नंदुरबार येथे दि .१२ मार्च भारत जोडो न्याय यात्रेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील पहिल्याच सभेत राहुल गांधी आक्रमक भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका केली आहे.

Rahul Gandhi speech, Maharashtra Nandurbar 12 March 2024

आदिवासी समाजाचा मुद्दा अधिक प्रखरतेने मांडत भाजपच्या वनवासी या शब्दावर जोरदार आक्षेप राहुल गांधीनी नोंदवला. (Tribal lands) केंद्र सरकार बड्या बड्या उद्योगपतींची कर्जं माफ करत आहे, त्यांना लाल गालिचा आंथरत आहे. मात्र, भारतातील आदिवासी, दलित आणि सामान्य शेतकऱ्यांसाठी मात्र हे सरकार काहीच करत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. (Rahul Gandhi)

केंद्रसरकारने कार्पोरेट उद्योगपतींसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीपैकी 25% आदिवासी, दलित आणि मागास समुदायांच्या मालकीची आहेत,आणि त्यांच्या जमिनी काढून घेतल्याने त्यांच्या  विकासावर  परिणाम झाला आहे,असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नंदुरबार येथील सभेत केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने उद्योगपतींची 65 हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. ही रक्कम साधीसुधी नाही. तर, मनरेगा योजनेचे जवळपास 24 वर्षांचे बजेट आहे.

जमीन अधिग्रहण कायद्यात कार्पोरेट धार्जिणे बदल केल्यामुळे आदिवासींच्या  जमिनीची विल्हेवाट लागली. वनजमीन कायदा भाजपने कमकुवत केल्याचे अधोरेखित करून, गांधींनी काँग्रेस सत्तेवर आल्यास एका वर्षाच्या आत आदिवासी समुदायांना जमिनी परत करण्याचे वचन दिले. ज्या भागात आदिवासी लोकसंख्येच्या 50 टक्के आहेत त्या भागात संविधानाची अनुसूची 6 लागू करण्याचे आणि त्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रसारमाध्यमे, सरकारी सेवेतील पहिल्या (क्लास वन) पदांच्या नोकऱ्या यांमध्ये कुठेच आदिवासी आणि गरीब माणूस दिसत नाही. इतकेच नव्हे तर विद्यमान केंद्र सरकारमध्ये सामान्य माणसाला कोणतेही स्थान नाही.काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिले काम म्हणजे आदिवासींच्या अधिग्रृहीत केलेल्या जमीनी त्यांच्या त्यांना परत केल्या जातील. ज्या जमीनिंवर कायदेशीर कार्यवाही आहे, त्यांबाबत सहा महिन्यात निर्णय घेतला जाईल. इतकेच नव्हे तर आमचे सरकार सत्तेत आल्यावर देशातील प्रत्येक, जात समूहाची गणना केली जाईल. ज्यामुळे त्या त्या घटकांची संख्या आणि प्रतिनिधीत्वही लक्षात येईल.

राहुल गांधी यांची नंदुरबारमधील सीबी मैदानावर सभा पार पडली.या सभेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, “हे” असणार नवे नाव…

ब्रेकिंग : आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव वाढ

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले २७ महत्वाचे निर्णय

जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही

संबंधित लेख

लोकप्रिय