मध्यप्रदेश : सोशल मीडिया वरती डिजिटल भिकाऱ्याची चर्चा जोरात रंगली असून या भिकाऱ्याला नेटिझन्स चांगलीच पसंती देत आहेत.
मध्य प्रदेशमधील छिंदवाडा येथील एका भिकाऱ्याने चक्क ऑनलाइन भीक मागणे सुरू केले असून या भिकाऱ्याच्या गळ्यामध्ये ऑनलाइन क्यू आर कोड लटकवलेला आहे आणि ज्या लोकांकडे सुट्टे पैसे नाहीत अशा लोकांना तो ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सांगतो.
छिंदवाडा येथे राहणारा एक भिकारी हेमंत सूर्यवंशी याची भीक मागण्याची स्टाइल अनोखे आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे लोकांनाही भीक देण्यासाठी गंमत वाटते. यामुळे लोक चटकन पैसे टाकतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया उपक्रम सुरू केला आहे . या उपक्रमाचा फायदा आता या भिकाऱ्याला सुद्धा होत आहे.
वर्तुळाकार इंद्रधनुष्य तुम्ही पाहिले का?
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती
आपल्या मांजरीच्या स्मरणार्थ त्याने बनवले तिच्या मृतदेहाला ड्रोन!