Minister Nitesh Rane : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संकट दिवसेंदिवस वाढत असून कांद्याच्या घसरलेल्या दरांविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात आयोजित सभेत नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांना एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने (onion Farmers) गळ्यात कांद्याची माळ घालून आपला संताप व्यक्त केला आहे.
मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची सभा सुरू असताना संबंधित शेतकऱ्याने मंचावर येत राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली. यानंतर शेतकरी माईकवरून आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी हस्तक्षेप करत, “त्याला थांबवा, त्याच्या समस्या ऐकून घेऊ,” असे सांगितले. तरीही, पोलिसांनी शेतकऱ्याला माईकवर बोलू न देता ताब्यात घेतले.
Nitesh Rane
मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात माळ घालण्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. (onion Farmers)
कांद्याच्या दरातील घट आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ
मुंबईत ठाकरे बंधू एकत्र : राज आणि उद्धव ठाकरे यांची भेट चर्चेला उधान
ब्रेकिंग : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन, फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले
ब्रेकिंग : शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात