Sunday, December 22, 2024
Homeकृषीदूधाचे दर वाढले, शेतकऱ्यांना फायदा होणार !

दूधाचे दर वाढले, शेतकऱ्यांना फायदा होणार !

पुणे : दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची तर दूध विक्री दरामध्ये 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दूध दर वाढीमुळे शेतक-यांना 3 रुपयाचा फायदा तर ग्राहकांना 2 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

सध्या बाजारात दूध पावडर, बटर यांचे दर वाढले आहेत, तसेच दूधाची मागणी वाढलेली असून दूधाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून दूध खरेदी दरात 3 रूपयांनी वाढविण्यात आले आहेत.

कामाच्या वेळेत सरकारी कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कारणासाठी मोबाईल वापरण्यावर बंदी; न्यायालयाचे आदेश

राज्यातील सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची कात्रज दूध संघ येथे बैठक पार पडली. कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी महानंद, चितळे, गोवर्धन, गोविंद, ऊर्जा, शिवामृत, कात्रज, राजहंस, स्फुर्ती, सोनाई, शिवप्रसाद, नेचर डिलाईट, रिअल डेअरी एस. आर. थोरात, अनंत, संतकृपा, सुयोग इत्यादी सहकारी व खाजगी दूधव्यावसायिकांचे ४७ प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत चर्चा होऊन दूध खरेदी दरात प्रति लिटर 3 रुपयाने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

संघाने दूध दरात वाढ केली असली तरी आजही ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून कमी दरानेच दूध खरेदी केली जात असल्याची ओरड आहे. त्यामुळे सरकारने राज्यभरात एकच दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्यासाठी धोरण आखण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

“समाजात तेढ निर्माण करणे चुकीचे” नाना पाटेकर यांनी मांडले परखड मत

माळशेज घाटात देशातला पहिला पारदर्शक वॉक-वे, पर्यटकांना हवेत चालण्याचं थ्रिल अनुभवता येईल


संबंधित लेख

लोकप्रिय