कोल्हापूर : आता महाराष्ट्रात पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्तीसोबतच महिलांच्याही स्पर्धा भरवल्या जाणार असल्याचे दिपाली सय्यद (Deepali Sayed) सोलापूर येथे म्हणाल्या. आता पनवेलमध्ये पहिली ‘महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा’ भरवणार असल्याचीही घोषणा अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केली. ही कुस्ती स्पर्धा डीबीएस रेस्टलिंग फाऊंडेशनतर्फे भरवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
“महिला कुस्तीपटूंना व्यासपीठ मिळवण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करत आहोत. पुरुषांसाठी अनेक स्पर्धा आहेत. मात्र, महिलांसाठी नाहीयेत. त्यामुळे त्यांनाही समान संधी मिळण्याची गरज आहे,” असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी महिलांसाठी मॅट आणि माती या दोन्ही प्रकारच्या कुस्तीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचेही सांगितले.
ब्रेकिंग : आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पेट्रोल – डिझेल च्या दरात वाढ !
पुरुष मल्लांप्रमाणे महिला मल्लांनीही आपल्या देशाला पदके मिळवून दिली आहेत. हरियाणातील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू गीता फोगाट आणि तिच्या इतर फोगाट बहिणींच्या आयुष्यावर थेट सिनेमेही बनवण्यात आले आहेत. त्यात ‘दंगल’ या सिनेमाचा समावेश आहे. यामुळे मुलींचा कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून मोठ्या प्रमाणात मुली या खेळाकडे वळत आहेत. अशात ‘महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धा’ महिला मल्लांसाठी मैलाचा दगड ठरू शकते.
आता राज्यभरात मराठीच कामकाज, राजभाषा विधेयक मंजूर !
व्हिडिओ : हायस्पीड रेल्वे समोर मुलाने घेतली उडी, जीवाची पर्वा न करता पोलिसांने वाचवला जीव