Thursday, December 12, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्यात कोरोना रुग्णांचा दोन लाखांचा टप्पा पार

राज्यात कोरोना रुग्णांचा दोन लाखांचा टप्पा पार

(मुंबई) :-  राज्यात आज ७२२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या २ लाख ७ हजार १९४ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९ हजार २५१ नवीन रुग्णांचे बाधित झाले असून सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

       आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० नमुन्यांपैकी ३ लाख ६६ हजार ३६८ नमुने पॉझिटिव्ह (१९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९४ हजार ५०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ६०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६५ टक्के एवढा आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय